शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर:(25 डिसेंबर, 2023)
अॅस्ट्रोसेज चे हे विशेष आर्टिकल शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर संबंधित माहिती प्रदान करेल. शुक्र ग्रह 25 डिसेंबर 2023 च्या सकाळी 06 वाजून 33 मिनिटांनी गोचर करत आहे. यामुळे शुक्राचे हे गोचर राशीचक्रच्या सर्व राशींना कश्या प्रभावित करेल. कालपुरुषाच्या कुंडलीच्या अनुसार, शुक्र आठव्या भाव (वृश्चिक राशी) मध्ये गोचर करेल. शुक्राच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडेल तेव्हा शुक्र गोचरच्या प्रभावाला जाणून घेण्याच्या आधी आपण बोलूया शुक्र ग्रह आणि वृश्चिक राशीच्या विशेषतः च्या बाबतीत!
खगोल शास्त्राच्या अनुसार, शुक्र एक असा ग्रह आहे जो पृथ्वीच्या तुलनेत सूर्याच्या अधिक जवळ स्थित आहे आणि हा आकार पृथ्वी समान आहे तसेच, शुक्राचा व्यास 7600 मील आहे आणि हे सूर्यापासून48° सेअधिक दूर जाऊ शकत नाही तथापि, सौरमंडलात शुक्र ग्रह सर्वात चमकदार ग्रह आहे.
शुक्र ग्रह आपल्या जीवनावर प्रभाव जाणून घेण्यासाठीअॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
ज्योतिष मध्ये शुक्र ग्रह आणि वृश्चिक राशीचे महत्व
वैदिक ज्योतिष अनुसार, शुक्र ग्रहाला प्रेम, विवाह, सौंदर्य आणि सुख सुविधांचा कारक ग्रह मानला गेला आहे. कुंडली मध्ये शुक्र देव मजबूत होण्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तथापि, शुक्राला स्त्री ग्रह मानले जाते आणि हे एक व्यक्तीच्या कुंडली मध्ये सुंदरता, रचनात्मकता आणि विलासिता इत्यादींचे प्रतिनिधित्व करते. शुक्र देव संगीत, कविता, पेंटींग, गायन, ड्रामा, ओपेरा, अभिनय इत्यादीला नियंत्रित करते.
वृश्चिक राशीविषयी बोलायचे झाले तर, ही राशिचक्राची आठवी राशी आहे याचा अधिपती देव मंगळ आहे. वृश्चिक जल तत्वाची राशी आहे जे शरीराच्या तामसिक तत्वांना नियंत्रित करते आणि ही सर्व राशींपैकी सर्वात अधिक संवेदनशील राशी आहे. वृश्चिक राशी व्यक्तीच्या जीवनात येणारे चढ-उतार आणि परिवर्तनाला दर्शवते सोबतच, जीवनातील गहन आणि लपलेल्या रहस्यांचे प्रतिनिधित्व करते. वृश्चिक राशीला खनिज आणि भूमी संसाधन जसे, पेट्रोल, गॅस आणि रत्न इत्यादींचा कारक मानले गेले आहे. हे दुर्घटना, दुखापत आणि सर्जरी इत्यादींचे प्रतीक मानले गेले आहे.
To Read in English Click Here: Venus Transit In Scorpio (25 December 2023)
हे राशिभविष्य तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. तुमची वैयक्तिक चंद्र राशी जाणून घेण्यासाठी चंद्र राशी कॅल्क्युलेटर वापरा.
शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर: राशी अनुसार प्रभाव आणि उपाय
मेष राशि
मेष राशीतील जातकांसाठी शुक्र तुमच्या दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे. आता हे 25 डिसेंबर 2023 ला तुमच्या आठव्या भावात गोचर करेल जे की, अचानक होणाऱ्या घटना, रहस्य आणि गूढ विज्ञान इत्यादींचा भाव आहे. मेष राशीतील जातकांच्या कुंडलीच्या आठव्या भावात कुठल्या ही ग्रहाच्या उपस्थितीला चांगले मानले जात नाही परंतु, या भावात शुक्राची उपस्थिती थोडी उत्तम सांगितली जाऊ शकते अश्यात, शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर त्या लोकांसाठी अनुकूल राहील ज्यांचा संबंध बँकिंग, इन्शुरन्स किंवा रेवेन्यू जनरेशन इत्यादी सोबत आहे. हा काळ पार्टनर सोबत संयुक्त संपत्ती मध्ये वृद्धी करण्याच्या दृष्टीने उत्तम राहील. या वेळी सासरच्या पक्ष सोबत तुमचे नाते प्रेमपूर्ण राहील आणि हे प्रत्येक पावली तुम्हाला त्यांचे प्रेम आणि साथ मिळेल.
तथापि, शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर होण्याने तुमच्या स्वभावात बदल पहायला मिळतील आणि तुम्हाला अचानक मूड स्विंग होऊ शकतो. या कारणाने तुम्ही आणि तुमच्या पार्टनर मध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. जर आपण शुक्र दृष्टीची गोष्ट केली तर, आठव्या भावात बसलेल्या शुक्राची उपस्थिती तुमच्या दुसऱ्या भाव आणि आपल्याच राशी वृषभ मध्ये पडत असेल. याच्या परिणामस्वरूप , शुक्राची दृष्टी धन संबंधित बाबतीत उत्तम सांगितली जाईल परंतु, कुंडली मध्ये दशा अनुकूल नसेल तर, तुम्हाला कुठल्या ही प्रकारची जोखीम घेण्याचा सल्ला दिला जातो कारण, शुक्र आठव्या भावाचा स्वामी आहे जे की, अचानक होणाऱ्या घटनांचा भाव आहे. या वेळी तुम्हाला घर-कुटुंबाची साथ मिळेल आणि या जातकांची वाणी मधुर राहील.
उपाय: नियमित महिषासुर मर्दिनी चा पाठ करा.
वृषभ राशि
वृषभ राशीतील जातकांसाठी शुक्र देव तुमच्या लग्न भाव आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि 25 डिसेंबर 2023 ला हे वृश्चिक राशीमध्ये आणि तुमच्या सातव्या भावात गोचर करत आहे. कुंडली मध्ये सातवा भाव विवाह, जीवनसाथी आणि व्यवसाय भागीदारी इत्यादींचे प्रतिनिधित्व करते अश्यात, वृषभ राशीतील जातकांचे सर्व लक्ष सातव्या भावाच्या संबंधित गोष्टींवर असेल. शुक्राचे हे गोचर त्या लोकांसाठी फलदायी राहील जे फ्रिलांसर, नोकरी करतात किंवा आपल्या व्यापारासाठी भागीदारीच्या शोधात आहे. या काळात तुम्ही आपल्या व्यवसायासाठी पार्टनर किंवा गुंतवणूकदार शोधण्यात सक्षम असाल तसेच, वृषभ राशीतील वैवाहिक जातकांना आपल्या वैवाहिक जीवनात समस्यांचा सामना करत आहेत तर, त्यांच्या जवळ आता या समस्यांना सोडवण्याची संधी आणि वेळ दोन्ही असेल अश्यात, तुम्ही नात्यात प्रेम आणि ताळमेळ दोन्ही वाढवण्यासाठी सक्षम असाल.
तसेच, वृषभ राशीतील सिंगल जातक जे विवाहाच्या बंधनात येण्याची इच्छा ठेवतात, ते शुक्र गोचर वेळी गंबीर रूपात योग्य पार्टनर च्या शोध करतांना दिसतील तथापि, शुक्र तुमच्या सहाव्या भावाचा स्वामी आहे याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला पार्टनरच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर वेळी तुम्हाला शत्रू आणि प्रतिद्वंदीकडे समस्या आणि आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. याच्या व्यतिरिक्त, सातव्या भावात उपस्थित शुक्राची दृष्टी आपल्याच राशी वृषभच्या लग्न भावावर पडत असेल अश्यात, तुम्ही आपल्या वेळ आणि धन चा उपयोग आपल्या सौंदर्यात निखार आणण्यासाठी करू शकतात.
उपाय: आपल्या बेडरूम मध्ये रोज क्वार्ट्ज स्टोन ठेवा.
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
मिथुन राशि
मिथुन राशीतील जातकांसाठी शुक्र तुमच्या बाराव्या भाव आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे आणि हे 25 डिसेंबर 2023 ला तुमच्या सहाव्या भावात गोचर करत आहे. कुंडली मध्ये सहावा भाव शत्रू, स्वास्थ्य, स्पर्धा आणि मामा इत्यादींचा भाव मानले गेले आहे. या प्रकारे, मिथुन राशीतील जातकांसाठी शुक्र एक मित्र ग्रह आहे परंतु, शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर इतर राशींच्या तुलनेत तुम्हाला थोडे कमजोर राहू शकते सोबतच, काही समस्यांना घेऊन ही येऊ शकतात. तुम्हाला सांगतो की, सहाव्या भावात शुक्राच्या स्थितीला अधिक चांगले मानले जात नाही कारण, काल पुरुषाच्या कुंडलीच्या अनुसार, सहाव्या भावात शुक्र नीच होतो. अश्यात, या वेळी कुठल्या ही व्यक्तीला धन उधार देणे टाळा.
या जातकांना आपल्या दैनिक जीवनात अत्याधिक अनुशासित होऊन चालावे लागेल. शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर चा कालावधी मिथुन राशीतील जातकांना आपल्या चरित्राला स्वच्छ आणि जीवनात उच्च मूल्य बनवून ठेवावे लागतील कारण, कुठल्या ही प्रकारच्या काळात संबंधात पडून तुम्ही आपल्यासाठी नवीन समस्या निर्माण करू शकतात. शुक्र गोचरच्या काळात आपल्या व्यवहारावर नियंत्रण ठेवा आणि चुकीच्या कार्यात शामिल होणे टाळा अथवा, तुम्हाला बदनामीचा सामना करावा लागू शकतो कारण, या काळात तुमच्या शत्रूच्या विरुद्ध षडयंत्र ठेवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
परंतु, जर सकारात्मक पक्षाची गोष्ट केली तर शुक्राच्या गोचर वेळी मिथुन राशीतील त्या जातकांसाठी अनुकूल राहील जे स्पर्धा परीक्षेच्या तयारी मध्ये आहे किंवा विदेशात जाण्याची तयारी करत आहे. याच्या विपरीत, सहाव्या भावात बसलेल्या शुक्राची दृष्टी आपल्याच राशी वृषभ आणि तुमच्या बाराव्या भावावर पडत असेल. याच्या परिणामस्वरूप, या जातकांच्या ऐश्वर्यपूर्ण जीवन जगण्याच्या कारणाने तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. जर तुमच्या कुंडली मध्ये दशा अनुकूल सांगितली जात नाही तर, तुम्हाला हानी चा ही सामना करावा लागू शकतो.
उपाय: नेत्रहीन विद्यालयांमध्ये सेवा दान करा.
कर्क राशि
कर्क राशीतील जातकांसाठी शुक्र ग्रह तुमच्या अकराव्या आणि चौथ्या भावाचा स्वामी आहे जे आता 25 डिसेंबर 2023 ला आपल्या शुक्ष्ण, प्रेम संबंध आणि संतान भाव म्हणजे की, पाचव्या भावात गोचर करत आहे. याच्या परिणामस्वरूप, कर्क राशीतील जातकांसाठी शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर अनुकूल राहील. या वेळी तुम्ही रचनात्मक असाल आणि प्रेम जोडपे एकमेकांसोबत आनंदाचे क्षण घालवतील आणि अश्यात, तुमच्या दोघांमध्ये नाते मजबूत होईल. या राशीतील जे जातक सिंगल आहे, ते या काळात नवीन नात्यात प्रवेश करू शकतात आणि त्यांची पार्टनर सोबत भेट सोशल सर्कल च्या माध्यमाने होऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांचा संबंध डिझाइंग, कला किंवा फॅशन इत्यादी रचनात्मक क्षेत्रांनी आहे त्यांच्यासाठी शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर चा काळ अनुकूल राहील. जे विद्यार्थी मेडिकल च्या क्षेत्रात शिक्षण घेत आहे त्यांचे प्रदर्शन शिक्षणात चांगले राहील. या राशीतील जातक आपल्या कुटुंबाला वाढवण्याची इच्छा आहे तर, त्यांना या वेळी शुभ वार्ता ऐकायला मिळेल.
कर्क राशीतील माता-पिता आपल्या मुलांसोबत आठवणींची वेळ घालावतांना दिसतील अश्यात, मुलांमुळे तुम्ही घर-कुटुंबात सुखद वातावरणाचा आनंद घ्याल सोबतच, तुम्ही मुलांच्या गरजांची काळजी पाहून वाहन जसे की, सायकल, टू व्हिलर किंवा गाडी इत्यादी खरेदी करण्याची योजना बनवू शकतात. शुक्र दृष्टी विषयी बोलायचे झाले तर, पाचव्या भावात बसलेल्या शुक्र ची दृष्टी तुमच्या अकराव्या भावावर होईल आणि फलस्वरूप, हे जातक सामाजिक मेळजोल वाढवतांना आणि मित्रांसोबत पार्टी करतांना दिसतील. कुंडली मध्ये पाचवे भाव सट्टेबाजी ही दर्शवते आणि या कारणाने तुम्ही गुंतवणूक इत्यादींच्या माध्यमाने उत्तम लाभ कमावू शकतात परंतु, असे पाऊल उचलण्याच्या आधी तुम्हाला काही अनुभवी ज्योतिषींच्या द्वारे कुंडली मध्ये चालत असलेल्या दशेचे विश्लेषण करण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: शुक्रवारी गुलाबी किंवा क्रीम रंगाचे कपडे घाला.
सिंह राशि
सिंह राशीतील जातकांच्या कुंडली मध्ये शुक्र ग्रहाला दहाव्या भाव आणि तिसऱ्या भावाचे अधिपत्य प्राप्त आहे आणि आता हे 25 डिसेंबर 2023 ला तुमच्या चौथ्या भावात गोचर करेल जे की, माता, घरगुती जीवन, घर, वाहन, संपत्ती इतादींचा भाव आहे अश्यात, सिंह राशीतील जातकांसाठी हे सांगणे चुकीचे नसेल की, शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर तुमच्या घर कुटुंबात आनंद देईल. या काळात तुम्ही तुमच्या घरगुती जीवनात खूप आनंदी दिसतील. शुक्र गोचर च्या काळात तुमची लहान भावंडे किंवा चुलत भाऊ तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येऊ शकतात. सिंह राशीचा बॉस आपल्या सहकाऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्याच्या घरी पार्टी करू शकतो किंवा या राशीचे कर्मचारी त्यांच्या बॉस किंवा सहकाऱ्यांना त्यांच्या घरी जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करू शकतात.
शुक्राचे गोचर कुटुंबातील सुखसोयी वाढवण्यासाठी चांगले असल्याचे म्हटले जाईल आणि अशा परिस्थितीत तुम्ही नवीन घर, नवीन वाहन किंवा कोणती ही चैनीची वस्तू खरेदी करू शकता किंवा घराचे नूतनीकरण देखील करू शकता. त्याच वेळी, चौथ्या भावात शुक्राची स्थिती तुमच्या व्यवसायाच्या भाव म्हणजेच दहाव्या भावावर पडेल. परिणामी, व्यवसाय, नाटक इत्यादींशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ चांगला राहील. या व्यतिरिक्त, सौंदर्य, सजावट इत्यादी लक्झरी सेवांशी संबंधित व्यवसाय करणार्या जातकांसाठी शुक्र गोचर चा काळ अनुकूल असेल कारण, या काळात तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल. या काळात सिंह राशीचे जातक घरून काम करताना दिसू शकतात किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यात स्वारस्य असू शकतात.
उपाय: शुक्रवारी आपल्या घरी सफेद फुलांचे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या सोबतच, कार्यस्थळी सडेफ फुल ठेवा.
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
कन्या राशि
कन्या राशीतील जातकांसाठी शुक्र महाराज तुमच्या नवव्या आणि दुसऱ्या भावाचा स्वामी आहे. 25 डिसेंबर 2023 ला शुक्र तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करेल. कुंडली मध्ये तिसरा भाव भाऊ-बहीण, रुची लहान दूरची यात्रा आणि संचार कौशल्य इत्यादींचे प्रतिनिधित्व करते. कन्या राशीतील जातकांसाठी आम्ही एक गोष्ट\निश्चित रूपात सांगू शकतो की, शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर वेळी तुमच्या बोलण्याची पद्धत खूप चांगली राहणार आहे सोबतच, या वेळी तुम्हाला बरीच यात्रा करावी लागू शकते यामुळे तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे. कन्या राशीतील जातकांसाठी आपल्या कुटुंबासोबत काही यात्रेची योजना बनवू शकतात आणि ही यात्रा लहान आणि थोडी मोठी दोन्ही होऊ शकते.
शुक्र गोचर वेळी तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात धन खर्च कराल तथापि, हा पैसा जो तुम्ही खर्च कराल ते व्यर्थ जाणार नाही कारण, तुम्ही आपल्या आवडीच्या गोष्टींचा आनंद घ्याल आणि भरपूर मौज-मस्ती कराल. जर तुम्हाला ऍडव्हेंचर यात्रेत जाण्याची इच्छा आहे तर, असे करणे तुमच्यासाठी खूप चांगले राहील. या काळात लहान भाऊ बहीण आणि कजिन्स सोबत तुमचे नाते प्रेमपूर्ण राहील. शुक्र दृष्टी विषयी बोलायचे झाले तर, तिसऱ्या भावात उपस्थित शुक्राची दृष्टी तुमच्या नवव्या भाव आणि स्वयंच्या राशी वृषभ मध्ये होईल. याच्या परिणामस्वरूप, या जातकांना पिता, गुरु आणि मेंटर ची साथ मिळेल सोबतच, कन्या राशीतील जातकांचा कल अध्यात्माच्या प्रति असेल आणि याच क्रमात तुम्ही धार्मिक गोष्टी आणि तीर्थयात्रेवर ही धन खर्च करतांना दिसाल.
उपाय: लहान भाऊ-बहिणीला परफ्यूम, घड्याळ किंवा कुठली ही कीमती वस्तु भेट करा.
तुळ राशि
तुळ राशीतील जातकांसाठी शुक्र देव तुमच्या लग्न आणि आठव्या भावाचा स्वामी आहे जो की,25 डिसेंबर 2023 ला तुमच्या दुसऱ्या भावात गोचर करत आहे. कुंडली मध्ये दुसरा भाव कुटुंब, बचत आणि वाणी इत्यादी चा भाव मानले गेले आहे अश्यात, शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर वेळी तुळ राशीतील जातकांचे सर्व लक्ष दुसऱ्या भावाच्या संबंधित गोष्टींवर असेल.
या काळात तुम्ही कुटुंबासोबत आनांदायक वेळ घालवाल आणि जीवनभर न विसरणाऱ्या आठवणी बनवाल परंतु, जसे की, आम्ही तुम्हाला सांगितले आहे की, शुक्र महाराज आठव्या भावाचा स्वामी ही आहे आणि अश्यात, जर तुमच्या कुंडली मध्ये प्रतिकूल दशेत चालत आहे तर, हे तुमच्या कौटुंबिक जीवनात अनिश्चितता आणण्याचे काम करू शकते आणि तुम्ही कुटुंबाला घेऊन अत्याधिक पजेसिव होऊ शकतात. शुक्र गोचर वेळी या जातकांमध्ये आपल्या बँक बॅलेन्स मध्ये वृद्धी करण्याची प्रबळ शक्यता उपस्थित असेल किंवा हे जातक धन प्रभावाला सुगम बनवण्यासाठी निरंतर प्रयत्न करतांना दिसतील तथापि, दुसऱ्या भावात शुक्राचे गोचर तुम्हाला आर्थिक रूपात समृद्ध बनवेल.
दुसऱ्या भावात शुक्राची उपस्थिती तुमचा आवाज गोड करेल. अशा स्थितीत हा काळ गायक, समालोचक, डबिंग कलाकार आदींसाठी अनुकूल आहे परंतु, नकारात्मक बाजूने, कुंडलीतील दुसरे भाव देखील खाण्याच्या सवयी दर्शवते आणि परिणामी, शुक्राच्या वृश्चिक राशीमध्ये गोचर दरम्यान, तुम्ही तळलेले, स्निग्ध पदार्थ आणि अल्कोहोल इत्यादींचे सेवन करू शकता. जे तुमच्यासाठी चांगले म्हणता येणार नाही. आरोग्य परिणामी, तुमचा खर्च वाढू शकतो. त्याच वेळी, दुसर्या भावातील शुक्र तुमच्या आठव्या भावात असेल आणि त्याच्या प्रभावामुळे तुमच्या जोडीदारासह तुमच्या संयुक्त संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. या शिवाय सासरच्या लोकांशी तुमचे संबंध ही सौहार्दपूर्ण होतील.
उपाय: शुक्र ग्रहाकडून शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी उजव्या हाताच्या करंगळीमध्ये चांगल्या प्रतीचा ओपल किंवा हिरा धारण करा.
वृश्चिक राशि
वृश्चिक राशीतील जातकांच्या कुंडली मध्ये शुक्र महाराज तुमच्या सातव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि आता हे तुमच्या व्यक्तित्व आणि शरीराचा भाव म्हणजे की, लग्न भावात प्रवेश करत आहे. शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर होण्याच्या कारणाने हे तुमच्या व्यक्तित्वाला सुंदर आणि आकर्षक बनवण्याचे काम करेल. अशा स्थितीत, तुम्ही स्वतःवर खूप पैसा खर्च करताना दिसतील आणि परिणामी तुमच्या बाराव्या भावाचा स्वामी शुक्र असल्यामुळे तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनी या गोचर दरम्यान त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तथापि, या राशीचे जातक जे कलाकार किंवा स्टेज परफॉर्मर आहेत त्यांना त्यांच्या कामामुळे समाजात एक वेगळी ओळख मिळेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. तसेच, या जातकांना परदेशात किंवा दूरच्या ठिकाणी ही आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळू शकते. परिणामी, या जातकांना विपरीत लिंगांमध्ये लोकप्रियता मिळेल आणि शक्यता आहे की, या काळात तुम्हाला विवाहासाठी जीवनसाथी देखील मिळू शकेल.
आता आपण पुढे जाऊन शुक्राच्या दृष्टीची गोष्ट केली असता, पहिल्या भावात बसलेला शुक्र तुमच्या सातव्या भावात असेल. कुंडलीतील सातवे भाव लग्न आणि व्यावसायिक भागीदारीचे प्रतिनिधित्व करते. अशा परिस्थितीत वृश्चिक राशीच्या विवाहित जातकांच्या वैवाहिक जीवनासाठी हा काळ चांगला राहील आणि या काळात तुमचे नाते प्रेमाने भरलेले असेल. शुक्राच्या प्रभावामुळे, तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील संबंध अधिक दृढ होतील. जर तुमचा तुमच्या जोडीदाराशी काही वाद होत असेल तर, या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा कालावधी उत्तम ठरेल. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील.
उपाय: नियमित परफ्यूम आणि सुगंधित अत्तराचा वापर करा. शुभ परिणामांना प्राप्त करण्यासाठी चंदनाच्या अत्तराचा उपयोग करा.
धनु राशि
धनु राशीतील जातकांसाठी शुक्र ग्रह तुमच्या सहाव्या भाव आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे जे 25 डिसेंबर 2023 ला तुमच्या बाराव्या भावात प्रवेश करेल. कुंडली मध्ये बारावा भाव विदेश, खर्च, दुरावा आणि हानी इत्यादींचे प्रतिनिधित्व करते. धनु राशीतील जातकांसाठी शुक्राला मित्र ग्रह म्हटले जाऊ शकत नाही आणि बाराव्या भावात शुक्राचे गोचर तुमच्या जीवनात बऱ्याच समस्या निर्माण करण्याचे काम करू शकते तथापि, अकराव्या भावाच्या स्वामीच्या रूपात शुक्र महाराजांच्या बाराव्या भावात गोचरचा अवधी कुठल्या ही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी चांगले सांगितले जात नाही सोबतच, या वेळी तुम्ही आपल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी खूप पैसे खर्च कराल.
जे जातक बहुराष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सहाव्या भावाचा स्वामी शुक्राचे बाराव्या भावात होणारे गोचर फलदायी ठरेल. परंतु, सकारात्मक बाजूंबद्दल बोलायचे झाल्यास, शुक्राचे गोचर आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि ध्यान इत्यादीसाठी अनुकूल असेल. मात्र, त्याच वेळी तुम्ही चैनीच्या वस्तूंवर तसेच मनोरंजनाच्या वस्तूंवर पैसे खर्च करताना दिसतील. त्याच वेळी, बाराव्या भावात उपस्थित असलेला शुक्र तुमच्या सहाव्या भावात दिसत आहे आणि परिणामी, तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात, ज्यामुळे तुमची प्रतिमा देखील खराब होऊ शकते. शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर तुम्हाला काही आरोग्य समस्या देखील देऊ शकते.
उपाय: नियमित 108 वेळा 'ॐ शुक्राय नमः' चा जप करा.
मकर राशि
मकर राशीतील जातकांच्या कुंडलीमध्ये शुक्राला दहाव्या आणि पाचव्या भावाचे स्वामित्व प्राप्त आहे. आता शुक्र 25 डिसेंबर 2023 ला तुमच्या अकराव्या भावात गोचर करेल. कुंडलीतील अकरावे भाव आर्थिक लाभ, इच्छा, मोठी भावंडे, काका इत्यादी दर्शवते. मकर राशीच्या जातकांसाठी शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर तुमच्या अकराव्या भावात होईल आणि ते तुमच्यासाठी अनुकूल राहील कारण, शुक्र तुमच्यासाठी योगकारक ग्रह आहे. परिणामी, या जातकांना नोकरीमध्ये त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला आर्थिक लाभाची ही अपेक्षा आहे. परंतु, हे सर्व सकारात्मक परिणाम त्यांच्या सोबत काही बदल घडवून आणू शकतात. मकर राशीचे विवाहित जातक ज्यांना आपले कुटुंब वाढवायचे आहे त्यांना शुक्र गोचर दरम्यान चांगली बातमी ऐकायला मिळेल. त्याच वेळी, मकर राशीचे पालक त्यांच्या जबाबदाऱ्या ओळखून त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मोठी गुंतवणूक करू शकतात.
या जातकांना पूर्वी केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. शुक्र गोचर काळात तुमच्या सर्व भौतिक इच्छा पूर्ण होतील. मकर राशीचे जातक त्यांच्या मित्रांसोबत किंवा कार्यालयातील सहकार्यांसह पार्टी करण्यात आणि सोशलाइझ करण्यात बराच वेळ घालवतील. या उलट, अकराव्या भावात उपस्थित असलेला शुक्र तुमच्या पाचव्या भावात दिसत आहे. अशा स्थितीत पाचव्या भावाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला सुख-शांती प्राप्त होईल. जर आपण या राशीच्या प्रेमींबद्दल बोलायचे झाले तर, शुक्राच्या गोचर दरम्यान, आपण आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि परिणामी, आपल्या दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल. या गोचर दरम्यान, मकर राशीचे विद्यार्थी सर्जनशीलतेने परिपूर्ण असतील आणि परिणामी, सर्जनशीलता किंवा डिझाइनिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांची कामगिरी चांगली असेल. या राशीच्या पालकांचे त्यांच्या मुलांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील.
उपाय: शुक्रवारी चांदी चा एक तुकडा आपल्या पर्स मध्ये ठेवा.
कुंभ राशि
कुंभ राशीतील जातकांसाठी शुक्र तुमच्या नवव्या भाव आणि चौथ्या भावाचा स्वामी आहे जे आता 25 डिसेंबर 2023 ला तुमच्या दहाव्या भावात गोचर करेल. कुंडली मध्ये दहावा भाव पेशा, कार्यस्थल आणि सामाजिक प्रतिमेला दर्शवते अश्यात, कुंभ राशीतील जातकांसाठी शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर फलदायी राहील, विशेष रूपात त्या जातकांसाठी ज्यांचे करिअर किंवा व्यवसाय शुक्र ग्रहाशी संबंधित आहे जसे की, फॅशन, डिझाइनिंग, लक्झरी वस्तू, दागिने, सौंदर्य उत्पादने किंवा महिला संबंधित उत्पादने इ. याशिवाय गायक, अभिनेते किंवा कलाकार इत्यादींसाठी ही हा काळ शुभ राहील. या जातकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी महिला अधिकारी किंवा बॉसकडून ही सहकार्य मिळेल. तथापि, कुंभ राशीच्या जातकांनी त्यांचा आदर करा आणि त्यांना तुमच्या बाजूने सर्व प्रकारे मदत करण्याचा सल्ला दिला आहे कारण, जर तुम्ही त्यांचा आदर केला नाही किंवा त्यांना मदत केली नाही तर, अशा प्रकारच्या वागण्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात बदनामी आणि समस्या येऊ शकतात.
तसेच, शुक्राचे वृश्चिक राशीमध्ये गोचर दरम्यान तुम्हाला कामाच्या ठिकाणी बदलांना सामोरे जावे लागू शकते. वडील, गुरु किंवा मार्गदर्शक यांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात पुढे जाण्यास सक्षम असाल. अशा परिस्थितीत, तुम्हाला वेळोवेळी त्यांचे आशीर्वाद आणि सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो कारण, ते तुमच्यासाठी फलदायी ठरेल. मात्र, दशम भावात बसलेल्या शुक्राची नजर तुमच्या घरगुती जीवनावर, घरावर आणि आईच्या घरावर म्हणजेच चौथ्या भावावर असेल. अशा स्थितीत शुक्राच्या प्रभावामुळे घरातील वातावरण आनंदाने भरलेले असेल आणि चैनीच्या वस्तू किंवा नवीन घर इत्यादी खरेदीसाठी ही हा काळ चांगला राहील.
उपाय: माता वैभव लक्ष्मी ची पूजा आणि व्रत करा सोबतच, शुक्रवारी त्यांना लाल रंगाचे फूल अर्पित करा.
मीन राशि
मीन राशीतील जातकांच्या कुंडलीमध्ये शुक्र देवाला तिसऱ्या आणि आठव्या भावाचे अधिपत्य प्राप्त आहे. आता ते 25 डिसेंबर 2023 ला तुमच्या नवव्या भावात प्रवेश करेल जे धर्म, धार्मिक कार्य, पितृत्व, लांबचा प्रवास, तीर्थक्षेत्रे आणि भाग्य इ. सामान्यतः मीन राशीच्या जातकांसाठी शुक्र हा अनुकूल ग्रह मानला जात नाही परंतु, तुमच्या नवव्या भावात वृश्चिक राशीत शुक्राचे गोचर असल्यामुळे तुम्हाला संमिश्र परिणाम मिळेल कारण, या भावातील शुक्राची स्थिती चांगली मानली जाते. या काळात तुमचा अध्यात्माकडे कल असेल आणि तुम्ही धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी होताना दिसतील. तसेच, तुमचे वडील, मार्गदर्शक आणि गुरु यांच्याशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुम्हाला त्यांच्या सोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. परिणामी, त्यांच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल.
परंतु, वृश्चिक राशीत शुक्राच्या गोचर दरम्यान, आपण आपल्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. या काळात तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासावर खूप पैसा खर्च कराल. तथापि, मीन राशीच्या ज्या विद्यार्थ्यांना मास्टर, पीएचडी किंवा गूढ विज्ञान इत्यादी विषयात संशोधन करायचे आहे त्यांच्यासाठी ही हा काळ फलदायी असेल. तथापि, नवव्या भावात विराजमान असलेले शुक्र महाराज तुमच्या धाकट्या भावंडांना, आवड आणि कमी अंतराचे प्रवास म्हणजेच तिसरे भाव पाहतील. परिणामी मीन राशीचे जातक आपले छंद जोपासताना दिसतील आणि त्यावर पैसे ही खर्च करतील. लहान भावंड आणि चुलत भावांसोबत तुमचे संबंध सौहार्दाचे राहतील आणि अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्या सोबत लहान अंतराच्या सहलीला किंवा तीर्थयात्रेला जाण्याचा विचार ही करू शकता. या राशीचे जातक जे मनोरंजन माध्यम किंवा करमणूक व्यवसायाशी संबंधित आहेत ते या काळात सर्जनशीलतेने परिपूर्ण असतील.
उपाय: शुक्रवारी माता लक्ष्मी ची पूजा करा आणि त्यांना कमळाचे फूल ही अर्पित करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा:अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024