शनी गोचर 2023 (Shani Gochar 2023)
शनी गोचर 2023 (Shani Gochar 2023): शनि ग्रहाला वैदिक ज्योतिष मध्ये न्यायदाता ग्रह मानले जाते आणि हे कर्म फळ प्रदान करणारे आहे आणि कर्म कारक ग्रह मानले जाते. शनिदेवाचे गोचर आपली राशी मकर मधून निघून स्वराशी कुंभ मध्ये 17 जानेवारी 2023 ला होत आहे. जर वेळेची गोष्ट केली असता 17 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 5:04 मिनिटांनी शनिदेव आपल्या मकर राशीमधून निघून कुंभ राशीमध्ये प्रवेश करतील आणि या पूर्ण वर्षापर्यंत याच राशीमध्ये कायम राहतील.
Read in English: Saturn Transit 2023 Horoscope
याच वर्षी 30 जानेवारी 2023 च्या प्रातः 12:02 पासून 6 मार्च रात्री 11:36 पर्यंत हे अस्त अवस्थेत राहतील. या नंतर 17 जून 2023 ला रात्री 10:48 वाजेपासून ते वक्री होतील. आणि 4 नोव्हेंबर 2023 ला प्रातःकाळी 8:26 वाजता परत एकदा मार्गी अवस्थेत येतील.
शनिदेवाच्या या गतीच्या प्रभावामुळे धनु राशीच्या जातकांना शनीच्या साडेसतीच्या प्रभावापासून पूर्ण मुक्ती मिळेल आणि मकर राशीच्या जातकांना साडे सतीचा दुसरा चरण संपवून तिसरा चरण सुरू होईल. कुंभ राशीच्या जातकांचा पहिला टप्पा संपून दुसरा टप्पा सुरू होईल आणि मीन राशीच्या जातकांसाठी शनी सतीचा पहिला टप्पा सुरू होईल.
बृहत् कुंडली: जाणून घ्या ग्रहांच्या तुमच्या जीवनावर प्रभाव आणि उपाय!
तुळ राशीच्या जातकांना शनीच्या सावलीपासून मुक्ती मिळेल आणि वृश्चिक राशीच्या जातकांना शनीची ढैया लागेल. अश्या प्रकारे मिथुन राशीतील कंटक शनीची ढैया समाप्त होऊन कर्क राशीतील जातकांना कंटक शनी ढैया सुरु होईल.
आपल्या जीवनावरील प्रभाव जाणून घेण्यासाठी अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
शनि हा असा ग्रह आहे, जो माणसाला जीवनात शिस्तबद्ध राहायला शिकवतो आणि न्यायाला प्रिय बनवतो. शिक्षक आपल्याला आपली ऊर्जा योग्य दिशेने मार्गी लावण्यासाठी तयार करतात. आपल्याकडून काही चूक झाली तर आधी प्रेमाने समजावून सांगतो आणि नंतर शिक्षा देऊन, त्याचप्रमाणे शनिसुद्धा माणसाला शिस्तीत राहायला शिकवतो आणि त्याच्या कृपेने माणूस ही मर्यादेत राहून काम करायला शिकतो. कुंभ राशीत शनि देवाच्या प्रवेशाने आपल्याला कळेल की, शनि जेव्हा कठीण निर्णय घेतो तेव्हा कोणते फळ मिळते आणि जीवनात केलेल्या कष्टाचे फळ देण्याची वेळ येते तेव्हा शनिदेव त्यांना मदत करतो. यामुळे जीवनात दृढता येते आणि करिअर मध्ये स्थायित्व यायला लागते. कुंभ राशीत शनीच्या गोचर मुळे आपल्याला आपल्या ध्येयांची जाणीव असली पाहिजे तरच, आपण आपल्या इच्छाशक्तीनुसार आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो. 2023 मध्ये कुंभ राशीतील शनिदेवाचे गोचर तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांवर जसे की व्यवसाय, नोकरी, विवाह, प्रेम, मुले, शिक्षण, आरोग्य इत्यादींवर कोणत्या प्रकारचे प्रभाव टाकू शकते ते जाणून घ्या.
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
शनि गोचर 2023 मेष राशि भविष्य
मेष राशि मध्ये शनी दशम आणि एकादश भावाचा स्वामी होऊन राशीच्या एकादश भावातच गोचर करेल. एकादश भाव आयचा भाव मानला गेला आहे आणि शनी देवाचे गोचर एकादश भावात सर्वात अधिक उपयोगी मानले जाते. शनि गोचर 2023 (Shani Gochar 2023) अनुसार, तुम्हाला हे वर्ष बरेच काही प्रदान करणार आहे. तुमच्या कमाई मध्ये अप्रत्यक्षित वाढ होण्याचे योग बनतील आणि कमाई प्राप्तीचे काही ना काही पक्के साधन ही या वर्षी तुम्हाला प्राप्त होईल. आता पर्यंत तुम्ही जितके ही कष्ट सहन केले आणि जितकी कठीण मेहनत केली आता एकवेळातच त्याचे पूर्ण फळ तंतुमच्या हातात असेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि महत्वाकांक्षा पूर्ती होईल. तुमच्या ज्या योजना लंबीत होत्या, त्या ही आता पुरं व्हायला लागतील आणि तुमचा आत्मविश्वास परत प्राप्त होईल. प्रेम संबंधांसाठी ही वेळ योजनाबद्ध पद्धतीने इमानदारीने आपले लक्ष मिळवण्याचे असेल. आपल्या आरोग्य समस्यांच्या प्रति थोडी सावधानी ठेवावी लागेल. अचानक धन प्राप्तीचे ही योग बनतील. सासर मध्ये काही कामासाठी तुमची आवश्यकता असेल आणि तुम्ही त्यांची मदत कराल तर तुमचे संबंध सासरच्या पक्षासोबत चांगले होतील.
शनि गोचर 2023 वृषभ राशि भविष्य
वृषभ राशीच्या नवव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी शनि वृषभ राशीतून दहाव्या भावात गोचर करतील. शनि तुमच्या भाग्यातून निघून तुमच्या कर्मात येईल. तुमचे नशीब आणि कर्म या दोन्हींचा स्वामी शनि तुमच्यासाठी मजबूत लाभदायक ग्रह आहे आणि दहाव्या भावात शनि देवाचे हे संक्रमण तुम्हाला अनपेक्षित विजय मिळवून देईल. तुम्ही तुमच्या कामात निष्णात व्हाल. तुम्ही व्यवसाय करा किंवा नोकरी करा, दोन्ही क्षेत्रात प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअर मध्ये स्थिरतेसाठी वेळ येईल. नोकरी-व्यवसायात पदोन्नती व बढतीची परिस्थिती राहील आणि नवीन योजना घेऊन पुढे जातील आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याची शक्यता निर्माण होईल आणि परदेशात जाऊन तुम्ही तुमचे काम आणखी वाढवू शकाल. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव असेल कारण, कुटुंबासाठी कमी वेळ मिळेल. कामात कमालीची व्यस्तता राहील. तथापि, वैवाहिक जीवनातील समस्यांकडे तुमचे लक्ष जाईल आणि तुम्ही त्या दूर करण्याचा प्रयत्न कराल. लाइफ पार्टनरसाठी काहीतरी करण्याची वेळ येईल.
शनि गोचर 2023 मिथुन राशि भविष्य
मिथुन राशीमध्ये शनि अष्टम आणि नवम भावाचा स्वामी होऊन मिथुन राशि पासून नवम भावात संक्रमण करत आहे. शनि गोचर 2023 (Shani Gochar 2023) अनुसार, या वर्षी तुम्हाला शनीच्या ढैया पासून मुक्तता मिळेल आणि तुम्ही मोकळा श्वास घ्याल. भाग्य भावात शनीचे हे गोचर लांबच्या प्रवासाची शक्यता निर्माण करेल. लांबच्या प्रवासामुळे तुमच्या आयुष्यात यश मिळेल. जरी या प्रवासांमुळे तुम्हाला थकवा आणि अस्वस्थता देखील येईल परंतु, तुम्हाला एक संतुलन स्थापित करावे लागेल जेणेकरुन तुम्ही जास्त थकवाला बळी पडू नये. वडिलांसोबतच्या नातेसंबंधावर परिणाम होईल आणि हा काळ त्यांच्या आरोग्यासाठी कमकुवत असेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीने नशीब कमवण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितके जास्त परिणाम तुम्हाला या काळात मिळू शकतील. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते परंतु, त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायात जोखीम घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे. कर्जात कमी होईल. ते खाली आणण्यासाठी खूप प्रयत्न करतील आणि यशस्वी ही होतील. विरोधकांवर विजय मिळवाल.
शनि गोचर 2023 कर्क राशि भविष्य
शनि गोचर 2023 अनुसार, कर्क राशि मध्ये शनि सप्तम आणि अष्टम भावाचा स्वामी असून कर्क राशीमधून अष्टम भावात गोचर करेल. या वर्षी तुम्हाला कंटक शनीची ढैया चा प्रभाव प्राप्त होईल. सासरच्या लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. कामात काही अडथळे नक्कीच येतील पण, तुमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळेल. काही मानसिक तणाव असेल आणि कामाच्या संदर्भात काही दडपण असेल परंतु, तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि हुशारीने प्रत्येक अडचणीतून बाहेर पडू शकाल. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. सासरच्यांकडून धन किंवा कोणत्या ही प्रकारचे सुख मिळू शकते. मुलाच्या बाबतीत काही काळजी वाटेल. प्रेम संबंधात चढ-उतार येतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्ही तुमच्या काही समस्यांवर गांभीर्याने विचार कराल आणि त्यांच्यासाठी मोठा निर्णय घेऊन त्यातून बाहेर पडू शकाल. चालू नोकरीत ही बदल होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि चांगली नोकरी मिळू शकते.
शनि गोचर 2023 सिंह राशि भविष्य
सिंह राशीमध्ये शनि षष्टम आणि सप्तम भावाचे स्वामी होऊन सिंह राशीपासून सप्तम भावातच गोचर करत आहे. शनी गोचर 2023 (Shani Gochar 2023) अनुसार, तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल खूप शिस्तबद्ध वाटेल परंतु, तुम्ही कोणत्या ही प्रकारची जबरदस्ती किंवा हुकूमशाही वृत्ती स्वीकारणे टाळावे अन्यथा, वैवाहिक जीवन खराब होऊ शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळेल आणि तुम्ही दोघे मिळून नवीन काम सुरू करू शकता. व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची कार्यक्षमता तुम्हाला यश देईल. कामानिमित्त लांबचा प्रवास कराल. तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत काही चांगल्या सहली करण्याची संधी मिळेल आणि आउटिंगला ही जाल. अतिव्याप्त आणि निष्काळजीपणा टाळणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असेल अन्यथा, आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्ही स्वतःबद्दल विचार कराल आणि चांगले व्यक्तिमत्व बनवण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसतील. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव नक्कीच असेल परंतु, तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणि त्यांच्या आनंदासाठी काहीतरी करावे लागेल. घरगुती खर्च वाढू शकतो. घरामध्ये बांधकाम करू शकता.
शनि गोचर 2023 कन्या राशि भविष्य
कन्या राशीमध्ये शनी पंचम आणि षष्टम भावाचा स्वामी होऊन कन्या राशीपासून षष्ठम धावतच संक्रमण करत आहे. हा काळ तुमच्या विरोधकांसाठी जड जाणार आहे कारण, येथे शनि तुम्हाला बलवान बनवेल. तुम्ही तुमच्या विरोधकांचे षटकार ठोकाल आणि त्यांनी किती ही प्रयत्न केले तरी ते तुमच्यावर मात करू शकणार नाहीत. या काळात तुम्हाला तुमच्या कर्जाकडे लक्ष द्यावे लागेल कारण, येथील शनी तुम्हाला शिकवेल की जोपर्यंत गरज नाही आणि कोणती ही जास्त समस्या येत नाही तो पर्यंत तुम्ही कर्ज घेऊ नका आणि या काळात तुम्ही कर्ज फेडण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नोकरीसाठी शनीची ही स्थिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही तुमच्या कामात निष्णात व्हाल आणि नोकरीत तुमचे स्थान मजबूत होईल. या काळात, तुम्ही चांगली आर्थिक स्थिती मिळविण्यासाठी जास्त काम करताना देखील दिसाल, ज्यामुळे शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. शनी गोचर 2023 (Shani Gochar 2023) अनुसार, तुमच्यासाठी परदेश प्रवासाची ही शक्यता आहे. खर्चात वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थोडे स्थिर व्हाल. भावंडांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. छोट्या सहली तुमची परीक्षा घेतील. मित्रांशी भांडण होणार नाही याची काळजी घ्या.
शनि गोचर 2023 तुळ राशि भविष्य
तुळ राशीमध्ये शनी चतुर्थ आणि पंचम भावाचा स्वामी होऊन तुळ राशीतून पंचम भावात गोचर करेल. शनी गोचर 2023 (Shani Gochar 2023) अनुसार, या वर्षी तुमच्या शनि की ढैया चा प्रभाव पूर्णपणे संपेल आणि तुम्ही तणावमुक्त अनुभवाल. पाचव्या भावात शनिचे गोचर प्रेम जीवनासाठी कसोटीचा काळ असेल. जर तुम्ही तुमच्या नात्यात खरे आणि निष्ठावान असाल तर, तुमचे नाते खूप सुंदर होईल आणि तुम्हाला तुमच्या प्रियकराला मिठी मारण्याची संधी मिळेल अन्यथा, नात्यात तणाव वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात आव्हानांना सामोरे जावे लागेल परंतु, त्यांनी नियमितपणे वेळापत्रक बनवून अभ्यास केल्यास ते खूप चांगले यश मिळवू शकतील. या दरम्यान तुम्ही तुमच्या मुलाला शिस्त लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतील. वैवाहिक जीवनासाठी हा काळ चांगला राहील. जर तुम्हाला कोणी आवडत असेल आणि फक्त त्याच्याशीच लग्न करायचे असेल तर या काळात तुम्हाला यश मिळू शकते आणि प्रेम विवाह होऊ शकतो. जीवनसाथी सोबत प्रेम ही वाढेल आणि जीवनसाथीच्या माध्यमातून आर्थिक लाभाची परिस्थिती ही निर्माण होईल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे आणि मनातील इच्छा पूर्ण झाल्यामुळे मनात आनंद राहील.
शनि गोचर 2023 वृश्चिक राशि भविष्य
वृश्चिक राशीमध्ये शनि तृतीय आणि चतुर्थ भावाचा स्वामी होऊन वृश्चिक राशीतून चतुर्थ भावात गोचर करेल. या वर्षी कुंभ राशीत शनीच्या गोचरने तुमच्या ढैया ची वेळ सुरू होईल. तुमच्या चौथ्या भावात शनिच्या प्रभावामुळे कुटुंबापासून दुरावा वाढू शकतो. तुमच्या स्थानामध्ये बदल होईल आणि तुम्ही सध्याच्या निवासस्थानापासून दूर जाऊ शकता. कुटुंबापासून दूर जाण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या ही थोडे भावनिक व्हाल. कौटुंबिक चिंता तुम्हाला अजून ही सतावतील आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करताना दिसतील. घर बांधण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी तुम्ही बँकेच्या कर्जासाठी अर्ज करू शकता. शनी गोचर 2023 (Shani Gochar 2023) अनुसार, या दरम्यान, कोणती ही संपत्ती खरेदी करण्यापूर्वी, त्याची संपूर्ण कायदेशीर तपासणी करा. आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची काळजी घ्या. हा काळ करिअर मध्ये चांगले यश देईल. तुम्ही खूप मेहनत कराल आणि वर्कहोलिक देखील होऊ शकता. यापेक्षा जास्त शारीरिक थकवा आणि अशक्तपणाची तक्रार असू शकते परंतु, तुम्ही तुमच्या कामात ठाम राहाल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल.
शनि गोचर 2023 धनु राशि भविष्य
धनु राशि मध्ये शनी दुसऱ्या आणि तृतीय भावाचा स्वामी होऊन धनु राशीच्या तिसऱ्या भावात गोचर करेल. आपकी साडेसाती पूर्णतः समाप्त होईल, यामुळे तुम्ही आनंदाची अनुभूती घेऊ शकतात. तिसऱ्या भावात शनीचे गोचर, ते ही आपल्या राशीमध्ये, तुमच्यासाठी उत्तम काम करेल. शनी गोचर 2023 (Shani Gochar 2023) अनुसार, तुम्हाला जे काही काम करायचे आहे ते तुम्ही पूर्ण जिद्दीने कराल आणि त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल. तुमचे मित्र असोत, तुमचे शेजारी असोत, तुमचे नातेवाईक असोत किंवा तुमची भावंडं असोत, प्रत्येकजण तुम्हाला तुमच्या कामात मदत करताना दिसेल. तुम्ही नोकरी करत असाल तर, ऑफिस मधील तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील आणि त्यांच्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले स्थान मिळवू शकाल. तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल. व्यवसायात ही जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढवून तुम्ही तुमचा व्यवसाय अपेक्षेपेक्षा जास्त वाढवण्यात यशस्वी होऊ शकता. प्रेम जीवनात यश मिळेल. तुमच्या प्रेमासाठी तुम्ही कोणत्या ही थराला जाण्यास तयार असाल आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम कराल. हा काळ तुमच्या मुलांसाठी प्रगतीचा असेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात ही चांगले परिणाम मिळतील आणि त्यांची मेहनत फळाला येईल. लांबचे प्रवास आणि कमी अंतराचे प्रवास वर्षभर चालू राहतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. परदेशात जाण्याची शक्यता ही निर्माण होऊ शकते.
शनि गोचर 2023 मकर राशि भविष्य
मकर राशीमध्ये शनी मकर राशि आणि दुसऱ्या भावाचा स्वामी होऊन मकर राशीच्या दुसऱ्या भावात ही गोचर करत आहे. तुमच्या शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण समाप्त होत आहे आणि तिसरे आणि अंतिम चरण प्रारंभ होत आहे. शनि चे तुमच्या दुसऱ्या भावात जाणे तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येईल. शनी गोचर 2023 (Shani Gochar 2023) अनुसार, तुमच्या कौटुंबिक जीवनात काही तणाव असेल आणि कुटुंबातील सदस्यांना आपापसात थोडी अव्यवस्था जाणवेल परंतु, तुम्ही खूप प्रयत्न केल्यास तुम्ही सर्व परिस्थिती हाताळण्यास सक्षम असाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागेल. तुम्ही पूर्वी किती ही मेहनत केली असेल, या काळात तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील आणि तुमची बँक बॅलन्स वाढू लागेल. संपत्ती जमा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. संपत्तीची खरेदी आणि विक्री केल्याने तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यात तुम्ही मागे हटणार नाही आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या नजरेत तुमचे स्थान उच्च असेल. तुम्ही केवळ तुमच्या कुटुंबाशीच नव्हे तर, तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाशी म्हणजे तुमच्या सासरच्या मंडळींशी ही चांगले संबंध प्रस्थापित करू शकाल आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना मदत करू शकाल. या काळात तुमचा सामाजिक स्तर ही उच्च असेल. व्यवसायात गुंतवणूक शहाणपणाने करावी लागेल. नोकरीत चांगले पद मिळेल.
शनि गोचर 2023 कुंभ राशि भविष्य
कुंभ राशीमध्ये शनि बाराव्या आणि प्रथम भावाचा स्वामी होऊन कुंभ राशीत गोचर करेल. कुंभ राशीची शनीच्या साडेसातीचे प्रथम चरण समाप्त होऊन दुसऱ्या चरणाची सुरवात होईल. तुमच्याच राशीमध्ये शनीचा प्रभाव होण्याने तुम्हाला आपल्या कर्मांना योग्य दिशा पुढे न्यावी लागेल. शनी गोचर 2023 (Shani Gochar 2023) अनुसार, जर तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात कठोर परिश्रम केले आणि कोणत्या ही परिणामाची अपेक्षा सोडून फक्त चांगले काम करण्यावर लक्ष केंद्रित केले तर, तुम्हाला प्रत्येक यश मिळेल. तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला त्या प्रमाणात मिळतील. करिअरसाठी हा काळ खूप चांगला आहे. परदेशी व्यवसायात ही तुम्हाला यश मिळू शकते. नोकरीत ही तुमचे स्थान कायम राहील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुम्ही मजबूत व्यक्तिमत्वाचे मालक व्हाल आणि तुम्ही करत असलेल्या कामात स्थिरता येईल. यामुळे तुम्हाला खूप आरामदायी वाटेल. भावंडांचे सहकार्य तुम्हाला मिळेल परंतु, काही प्रकारची शारीरिक समस्या त्यांना त्रास देऊ शकते. वैवाहिक जीवनासाठी हा काळ फारसा चांगला नसेल आणि कामामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारापासून काही काळ दूर असाल परंतु, परस्पर सौहार्द निर्माण करून तुम्ही या वेळेचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल.
शनि गोचर 2023 मीन राशि भविष्य
शनि गोचर 2023 नुसार, मीन राशीतील अकराव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी शनि मीन राशीतून बाराव्या भावात प्रवेश करेल. मीन राशीच्या जातकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. बाराव्या भावात शनीच्या संक्रमणामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे खूप लक्ष द्यावे लागेल. या शनि संक्रमण दरम्यान, तुम्ही तुमच्या पायात दुखणे, घोट्यात दुखणे किंवा तुमच्या पायात कोणत्या ही प्रकारची दुखापत किंवा मोच झाल्याची तक्रार करू शकता. याशिवाय डोळ्यांत पाणी येणे, डोळे दुखणे किंवा दृष्टी कमी होणे अशा तक्रारी ही होऊ शकतात. याची थोडी काळजी घ्या. या दरम्यान तुमच्या आत आळस वाढेल आणि तुम्हाला जास्त झोप लागेल, पण तुम्हाला त्यातून बाहेर पडून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर, त्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. शनी गोचर 2023 (Shani Gochar 2023) अनुसार, परदेशात जाऊन चांगले पद मिळवू शकता. पैशाच्या खर्चात मोठी वाढ होईल आणि जवळच्या व्यक्तीच्या आरोग्यावर ही चांगला खर्च करावा लागू शकतो. परकीय व्यापारातून अधिक परकीय चलन मिळण्याची शक्यता आहे. विरोधक आणि कोर्टाशी संबंधित बाबींसाठी तुम्हाला खर्च करावा लागेल, तरच विजय मिळेल. हा काळ तुम्हाला लांबचा प्रवास करायला लावेल आणि अनेक प्रवास तुमच्या इच्छेविरुद्ध होतील आणि मानसिक तणाव देईल. या दरम्यान, तुमच्यासाठी योग्य मार्गावर चालणे खूप महत्वाचे असेल.
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024