होळी 2023: Holi
होळी 2023: भारतात बऱ्याच प्रकारचे सण साजरे केले जातात परंतु, यामध्ये परस्पर प्रेम आणि सद्भावनेला मजबूत करणारा होळी ह्या सणाचे विशेष महत्व आहे. भारतात प्रमुख सणांपैकी होळी हा एक सण आहे. जो कि आपल्या जीवनात उत्साह, उल्हास भरण्याचे काम करतो. हिंदू पंचांगाच्या अनुसार, होळीचा सण वर्ष फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याची सुरवात थंडीला बाय बाय करण्याचा संदेश देते आणि वातावरण थोड्या प्रमाणात चांगले होते. या सणाच्या वेळी फाग गाण्याची परंपरा उत्तर भारतात आहे. चला तर मग पुढे जाऊया आणि जाणून घेऊया अॅस्ट्रोसेज च्या या विशेष ब्लॉग मध्ये वर्ष 2023 मध्ये होळीचा सण कोणत्या दिवशी साजरा होईल व कोणत्या दिवशी शुभ योग बनत आहे. याच्या व्यतिरिक्त, या दिवशी केल्या जाणाऱ्या रंगांच्या बाबतीत ही चर्चा करू.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
होळी 2023 तिथी आणि मुहूर्त
फाल्गुन शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी प्रारंभ: 06 मार्च 2023, 16:20 पासून
पौर्णिमा तिथी समाप्त: 07 मार्च 2023, ला 18:13 पर्यंत
अभिजीत मुहूर्त: दुपारी 12 वाजून 09 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 56 मिनिटांपर्यंत
होलिका दहन तिथी: 07 मार्च 2023, मंगळवार संध्याकाळी 06 वाजून 24 मिनिटांपासून रात्री 08 वाजून 51 मिनिटांपर्यंत.
अवधी: 2 तास 26 मिनिटे
रंग वाली होळी: 08 मार्च 2023, बुधवार
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
होळी 2023: पौराणिक महत्व
होळी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. पुराण, दशकुमारचरित, संस्कृत नाटक, रत्नावली आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. होळी हा सनातन धर्मातील सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपारिक सण आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, होळीचा सण नवीन युगाची सुरुवात मानला जातो. या दिवसाशी अनेक श्रद्धा ही जोडल्या जातात. काही लोकांचा असा विश्वास आहे की, या दिवशी पृथ्वीवर पहिला मानव जन्माला आला होता. त्याच बरोबर काही लोकांचा असा ही विश्वास आहे की कामदेवाचा ही याच दिवशी पुनर्जन्म झाला होता तर, काही लोकांच्या मते याच दिवशी भगवान विष्णूच्या नरसिंहाचे रूप घेऊन हिरण्यकश्यपचा वध झाला होता.
होळी हा सण भगवान श्रीकृष्णाला सर्वात प्रिय होता असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळेच ब्रजमध्ये होळी हा सण 40 दिवस साजरा केला जातो. अशा परिस्थितीत भगवान श्रीकृष्णाने सुरू केलेली ही परंपरा आज ही त्यांच्या नगर मथुरेत पाहायला मिळते. होळी हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हा एक सण आहे जेव्हा लोक त्यांच्यातील मतभेद विसरून एकत्र येतात. दुसरीकडे, धार्मिक महत्त्वाबद्दल सांगायचे तर, या दिवशी होलिकेत सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मकतेची सुरुवात होते.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निएस्ट्रो रिपोर्टने करा दूर
होळी 2023: पूजा विधी
होलिका दहनाच्या एक दिवस आधी होळीची पूजा केली जाते. मग होळीच्या दिवशी रंग खेळले जातात. होलिका दहनाची पूजा करण्यासाठी काही दिवस अगोदर झाडाच्या फांद्या, गोवऱ्या इत्यादी एकाच ठिकाणी गोळा केल्या जातात. त्यानंतर होलिका दहनाच्या दिवशी होलिकाजवळ पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. सर्व प्रथम गणेशाची आणि गौरीची पूजा करावी. यानंतर या मंत्राचा जप केला पाहिजे- ‘ऊँ होलिकायै नम:’, ‘ऊँ प्रह्लादाय नम:’ और ‘ॐ नृसिंहाय नम:’। याशिवाय होलिका दहनाच्या वेळी गव्हाचे कणीस आगीत भाजले जातात, जे नंतर खाल्ले जातात. असे मानले जाते की, यामुळे व्यक्ती निरोगी राहते.
यानंतर बडकुल्लाच्या 4 माळा घेतल्या जातात आणि या हार आपल्या पूर्वजांना, हनुमानजी, शीतला माता आणि कुटुंबासाठी अर्पण केल्या जातात. त्यानंतर होलिका 3 किंवा 7 वेळा प्रदक्षिणा केली जाते. परिक्रमा करताना होलिकेभोवती कच्चे सूत गुंडाळले जाते. त्यानंतर मडक्यातील पाणी आणि इतर पूजेचे साहित्य होलिकेला अर्पण करावे. धूप, फुले इत्यादींनी होलिकाची पूजा करा.
होळी 2023 मध्ये करा हे सहज उपाय
-
होळीच्या रात्री घराच्या मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावून त्याची पूजा करावी. यानंतर सुख-समृद्धीसाठी देवाची प्रार्थना करावी. असे मानले जाते की, यामुळे प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.
-
व्यवसायात किंवा नोकरीत अडचण येत असेल तर, होलिका दहनाच्या रात्री 21 गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे तुमच्या व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता वाढते.
-
होळीच्या दिवशी एखाद्या गरीबाला जेवन खाऊ घाला. असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते.
-
जर तुम्ही राहुच्या दुष्परिणामाने हैराण असाल तर, नारळ वाटी घ्या आणि त्यात जवसाचे तेल भरून घ्या. त्यात थोडा गूळ टाका आणि हा गोळा पेटत्या आगीत टाका. असे केल्याने राहूचा वाईट प्रभाव संपतो असे मानले जाते.
-
घरामध्ये सुख-समृद्धीसाठी होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर गुलाल उधळून त्यावर दोनमुखी दिवा लावावा.
होळीला राशी अनुसार रंगांची निवड, चमकेल भाग्य
होळीला राशी अनुसार रंग निव्वडून होळी खेळल्याने कुंडली मध्ये उपस्थित सर्व ग्रह दोषांना दूर केले जाऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी कोणता रंग खेळणे शुभ असेल.
मेष आणि वृश्चिक राशि
मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिष अनुसार, मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे म्हणून, या राशींतील जातकांना होळीच्या दिवशी लाल, गुलाबी किंवा याने मिळत्या-जुळत्या रंगांचा वापर केला पाहिजे.
वृषभ आणि तुळ राशि
वृषभ आणि तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या ग्रहाचा रंग सफेद आणि गुलाबी मानला जातो. अश्यात, होळीच्या दिवशी तुम्ही सिल्व्हर रंग आणि गुलाबी रंगांची होळी खेळू शकतात.
कन्या आणि मिथुन राशि
कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाचा रंग हिरवा असतो अश्यात, या राशीतील जातकांना होळीच्या हिरव्या रंगाने खेळली पाहिजे. या व्यतिरिक्त, तुम्ही पिवळ्या, नारंगी आणि लाइट पिंक रंगाचा ही वापर जर शकतात.
मकर आणि कुंभ राशि
यांचे स्वामी शनिदेव आहे. शनी देवाचा रंग काळा किंवा निळा असतो म्हणून, मकर राशी आणि कुंभ राशीतील जातकांसाठी निळा रंग शुभ राहील. काळ्या रंगाने होळी खेळणे शक्य नाही म्हणून, निळ्या किंवा विर्व्य रंगाचा वापर करू शकतात.
धनु आणि मीन राशि
धनु आणि मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे. याचा प्रिय रंग पिवळा मानला जातो. अश्यात, या राशीतील जातकांना पिवळ्या रंगाने होळी खेळली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त, नारंगी रंगाचा ही वापर केला जाऊ शकतो.
कर्क राशि
कर्क आणि सिंह राशीचा स्वामी चंद्र आहे आणि या राशीतील लोकांना सफेद रंगाने होळी खेळणे चांगले असेल. जर सफेद रंगाने होळी खेळणे शक्य नसेल तर, तुम्ही कुठला ही रंग घेऊन त्यात दही किंवा दूध मिळवले पाहिजे.
सिंह राशि
सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे अश्यात तुम्ही नारंगी, लाल आणि पिवळ्या रंगाने होळी खेळू शकतात.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024