हस्त नक्षत्राची भविष्यवाणी

तुम्ही शिस्तप्रिय आहात आणि कोणत्याही समस्येचे फार अवडंबर न माजवता सामोरे जाता. तुम्ही चौकस असल्यामुळे तुमच्या डोक्यात अनेक कल्पना येत असतात. तुम्ही कुणाकडून फसवले जरी गेलात तरी तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध काही वाईटसाईट बोलत नाही. स्वभावाने तुम्ही शांत आणि तुमच्या स्वभावामुळे तुमच्याकडे लोक आकर्षित होतात. तुम्ही संतुष्ट, मिळून-मिसळून वागणारे, मैत्रीपूर्ण आहात. तुम्ही अभ्यासात एकदम तल्लख असून तुम्ही शब्दांचे जादूगार आहात. तुम्हाला कोणताही विषय पटकन समजतो. थोडेसे गोड बोलून तुम्ही कोणत्याही गटात मिसळून जाता आणि तुमच्यात विनोदाचेही अंग आहे. इतकी सगळी मानसिक क्षमता असताना कोणताही निर्णय तुम्ही पटकन घेत नाही. तुम्ही शांतताप्रिय असल्यामुळे तुम्ही भांडणांपासून तसे दूरच राहता. तुम्ही मनस्थिती बरेचदा द्विधा असते, असे असले तरी तुम्ही नवीन मित्र जोडता. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांकडून काम कसे काढून घ्यायचे ते तुम्हाला पक्के ठावूक आहे. तुमच्या मतलबानुसार तुम्ही पक्ष बदलता. नोकरीपेक्षा व्यवसाय करणे तुम्हाला अधिक रुचते. त्यामुळेच या ठिकाणी तुम्ही जास्त यशस्वी व्हाल. तुम्हाला सगळ्या प्रकारचे भौतिक आनंद हवे असतात. तुमचे आयुष्य आनंदी आहे आणि तुम्हाला इतरांकडून तुमच्या कामाबद्दल आदर मिळतो. तुम्ही जो निर्णय घेता, त्यासाठी तुम्ही पूर्ण समर्पित होता. लोकांप्रमाणे तुम्ही तुमचे निर्णय बदलत नाही, तुम्हाला जे वाटते तेच तुम्ही करता. सामान्यपणे तुम्हाला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत नाही, कारण पैशाची बचत कशी करायची ते तुम्हाला व्यवस्थित माहीत आहे. तुम्ही शांतताप्रिय व्यक्ती आहात आणि दुसऱ्याला मदत करायला सदैव तत्पर असता आणि तुम्हाला दिखाऊपणा अजिबात आवडत नाही. तुमच्या कुटुंबात अनेक चढ-उतार असतील पण तुम्ही सदा हसतमुख असाल. मुद्दे तडीस नेण्यात तुमची हातोटी आहे. त्यामुळे तुम्ही एक चांगले समुपदेशक आहात. तुम्ही लोकांना खेळीमळीत आणि गमतीजमतीत आयुष्यातील धडे शिकवता कारण तुमच्या मते आयुष्य हा एक खेळ आहे आणि जग म्हणजे त्या खेळाचे मैदान. तुम्हाला स्वस्थ बसून राहणे आवडत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्रीय असता. तुमचा स्वभाव खेळकर असला तरी तुम्ही दुसऱ्याने केलेल्या चुका सहन करू शकत नाही. तुमच्या प्रयत्नांनी आपले इच्छित फल प्राप्त करून घेणे हा तुमचा विशेष गुण आहे.
शिक्षण आणि उत्पन्न
तुम्हाला शिस्तशीर पद्धतीने काम करणे आवडते. तुम्ही सर्वांना मागे टाकून जाता आणि हे सिद्ध कसे करायचे ते तुम्हाला माहीत आहे. सोनारकाम, हस्तकला, व्यापारी, अॅक्रोबॅट, जिम्नॅस्ट किंवा सर्कसमधील कलाकार, पेपरच्या उत्पदनाशी संबंधित काम, शेअर बाजार, पॅकेजिंग, खेळणी उत्पादन, दुकान, लिपिक, बँकेतील काम, टंकलेखक, फिजिओथेरपिस्ट, सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित काम, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, कपड्यांशी संबंधित काम, शेती, बागकाम, रेडिओ आणि दूरचित्रवाणी; वृत्तनिवेदक, पत्रकारिता, चिकणमाती आणि सिरॅमिकशी संबंधित क्षेत्रे इत्यादी तुम्हाला अनुकूल असतील.
कौटुंबिक आयुष्य
तुमचे आदर्श वैवाहिक आयुष्य असेल, पण काही लहानसहान कुरबुरी असणे शक्य आहे. तुमच्या जोडीदाराची वागणूक चांगली आहे. तुमचे पहिले अपत्य हा बहुधा मुलगा असेल.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024