गुरु गोचर 2024 (Guru Gochar 2024)
गुरु गोचर 2024: गोचर अर्थात ग्रहांचे परिवर्तन! ज्योतिष मध्ये ग्रहांच्या गोचर ला विशेष महत्व दिले जाते. मानले जाते की, जेव्हा कुठला ग्रह परिवर्तन करतो मग ते राशी परिवर्तन असो किंवा नक्षत्र परिवर्तन असो किंवा गती परिवर्तन असो यामुळे मानव जीवनावर शुभ अशुभ दोन्ही प्रकारचे प्रभाव पहायला मिळतात.
वैदिक ज्योतिष मध्ये सर्व ग्रहांचा गोचर काळ वेगवेगळा सांगितला गेला आहे. तसे तर सर्व ग्रहांचे परिवर्तन महत्वपूर्ण असते परंतु, जेव्हा गुरु गोचर ची गोष्ट केली जाते जेव्हा याला अधिक महत्व दिले जाते. याचे कारण बरेच आहेत. बृहस्पती ला देव गुरूचा दर्जा दिला गेला आहे आणि हे एक शुभ ग्रह असते. मानले जाते की, जेव्हा ही बृहस्पती चे गोचर होते तेव्हा ज्या ही भावांवर बृहस्पती ची दृष्टी पडते तेव्हा अमृताच्या समान शुभ फळ व्यक्तीच्या जीवनात प्राप्त होण्याची शक्यता वाढते.
आपल्या जीवनावरील प्रभाव जाणून घेण्यासाठी अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
याच्या व्यतिरिक्त, शनी नंतर बृहस्पती एक असा ग्रह आहे जो अधिक मंद गतीने चालतो. हा एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करण्यात जवळपास 13महिन्यांचा वेळ लावतो. मागील वर्षी 2023 मध्ये 22 एप्रिल ला गुरुचे गोचर झालेले होते जेव्हा ते आपल्या स्वराशी अर्थात मीन मधून निघून मेष मध्ये प्रवेश केलेला होता.
तसेच, या वर्षी जेव्हा गुरु दैत्य गुरु शुकाच्या मीन राशीमध्ये अर्थात वृषभ राशीमध्ये 1 मे 2024 ला गोचर करणार आहे. अश्यात, स्वाभाविक आहे की, गुरुचे हे गोचर बऱ्याच महिन्यात खास, महत्वपूर्ण आणि विशेष राहणार आहे. आज आपल्या या विशेष ब्लॉग च्या माध्यमाने आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की, गुरुचे हे गोचर सर्व 12 राशींवर कश्या प्रकारे प्रभाव टाकेल आणि काय उपाय करून तुम्ही गोचर पासून मिळणाऱ्या नकारात्मक परिणामांना शुभ परिणामात बदलू शकतात.
गुरु गोचर 2024: वेळ आणि तिथी
गोचर फळ जाणून घेण्याच्या आधी सर्वात आधी जाणून घेऊ गुरुचे हे गोचर केव्हा आणि कोणत्या वेळी होणार आहे. अश्यात, तिथी ची गोष्ट केली तर, हे गोचर 1 मे 2024 ला होईल आणि वेळे बद्दल बोलायचे झाले तर हे दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी होईल जेव्हा देवगुरु मेष राशीमधून निघून वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल.
गुरु चे हे परिवर्तन ही राहील अहम: फक्त इतकेच नाही तर, या गोचरच्या ठीक 2 दिवसानंतर म्हणजे 3 मे ला उशिरा रात्रीपर्यंत 22 वाजून 08 मिनिटांनी गुरु अस्त होणार आहे. या नंतर 1 महिन्यानंतर अर्थात, 3 जून ला प्रातः 3 वाजून 21 मिनिटांनी गुरु उदित होईल.
येथे हे जाणून घेणे अधिक आवश्यक आहे की, सनातन धर्मात जेव्हा गुरु अस्त होतो तेव्हा या वेळी कुठल्या ही प्रकारचे शुभ किंवा मंगल कार्य जसे, विवाह इत्यादी केले जात नाही. अश्यात जेव्हा 3 जून पासून गुरु उदित होईल तेव्हा मंगल कार्य परत सुरु केले जाऊ शकतील.
वर्ष 2024 च्या सर्वात सटीक आणि विस्तृत भविष्यवाणी साठी वाचा राशि भविष्य 2024
या नंतर वर्ष 2024 मध्ये 9 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 10 वाजून 01 मिनिटांनी गुरु वक्री होईल आणि त्याची ही वक्री चाल अर्थात उलटी चाल पुढील वर्ष म्हणजे 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत 13 वाजून 46 मिनिटांपर्यंत राहणार आहे.
अश्यात, गुरुचे गोचर च नाही तर वर्ष 2024 मध्ये गुरूचे बरेच परिवर्तन होणार आहे. यामुळे मानव जीवन निश्चित प्रभावित होईल. वैदिक ज्योतिष मध्ये बृहस्पती अर्थात गुरु ला शुभ आणि वृद्धीचा कारक ग्रह ही मानले जाते. चला तर, आता पुढे जाणून जाणून घेऊ गुरु गोचर 2024 तुमच्या राशीसाठी कश्या प्रकारे परिणाम घेऊन येणार आहे.
हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
गुरु गोचर 2024: राशि भविष्य आणि उपाय
मेष राशि
देव गुरु बृहस्पती तुमच्या राशीसाठी खूप महत्वपूर्ण ग्रह आहे कारण, हे तुमच्या भाग्य भावाचा स्वामी आहे आणि जीवनात भाग्य प्रबळ नसेल तर व्यक्तीच्या प्रत्येक क्षेत्रात संघर्ष असते. नवम भाव सोबतच हे तुमच्या द्वादश भावाचा स्वामी ही आहे आणि वृषभ राशीमध्ये गुरु गोचर होण्याने तुमच्यावर त्याचा विशेष प्रभाव पडणार आहे कारण, देव गुरु बृहस्पती जो की, तुमच्या नवम भावाचा स्वामी आहे, तो आपल्या गोचर अवस्थेत तुमच्या द्वितीय भावात जाऊन धन योग निर्मित करेल आणि यामुळे तुम्हाला उत्तम आथिर्क लाभ प्राप्ती होईल. तुमचा बँक बॅलेंस वाढेल, धन संचित करण्यात तुम्ही यशसवी व्हाल. तुमच्या कमाई मध्ये गंभीरता येईल. लोक तुमच्या गोष्टींना खूप प्रेमाने ऐकतील. येथे स्थित बृहस्पती तुम्हाला कौटुंबिक सदस्यांसोबत जोडून ठेवेल. जर तुम्ही पैतृक व्यवसाय करतात तर, या गोचरचा अशातीत लाभ तुम्हाला आपल्या व्यापारात पहायला मिळेल. कुटुंबातील वृद्ध सदस्यांसोबत ही तुम्हाला सुख आणि आशीर्वाद प्राप्त होतील.
उपाय: तुम्ही गुरुवारी लाल गाईला पिठात हळदी टाकून खाऊ घाला. आणि त्या गाईच्या दुधाने घरात कुठली ही मिठाई बनवून भगवान विष्णूला अर्पण करून स्वतः भोग स्वरूपात ग्रहण केले पाहिजे.
वृषभ राशि
देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीसाठी अष्टम भाव आणि एकादश भावाचा स्वामी आहे. तुम्ही या गोचर काळात देव गुरु बृहस्पती तुमच्या प्रथम भाव म्हणजे की, तुमच्याच राशीमध्ये विराजमान असतील. बृहस्पती देवाचे हे गुरु गोचर 2024 वृषभ राशीमध्ये असण्याच्या कारणाने तुमच्यासाठी विशेष प्रभावशाली सिद्ध होऊ शकते. तुमच्या दोन आकारक भावांचा स्वामी असण्याच्या कारणाने गुरु बृहस्पती शुक्राच्या राशीमध्ये अधिक अनुकूल परिणाम देत नाही. अष्टम भावाच्या स्वामीचे तुमच्या राशीमध्ये गोचर करणे तुम्हाला गुप्त विद्या आणि गुप्त ज्ञान प्रदान करण्यात मदत करेल. तुम्ही ज्योतिष, रिसर्च इत्यादी विषयांमध्ये किंवा काही गुप्तचर सेवेत खूप चांगले प्रदर्शन करू शकतात आणि त्यात तुम्हाला यश ही मिळू शकते. तुम्ही दान, धर्म, तंत्र, मंत्र जसे कार्य ही करू शकतात. एकादश भावाच्या स्वामीचे तुमच्या राशीमध्ये जाणे आर्थिक लाभाचे योग बनतील. तुम्ही धन प्राप्त करण्याच्या दिशेत प्रयत्नरत असाल आणि यासाठी जितके शक्य असेल तितका प्रयत्न कराल. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार येईल परंतु, या भावांच्या स्वामीचे तुमच्या राशीमध्ये असणे तुमच्या स्वास्थ्यासाठी अनुकूल सांगितले जाऊ शकत नाही. तुम्हाला उदर रोग आणि चयापचय (मेटाबोलिस्म) संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. येथे स्थित देव गुरु बृहस्पती तुमच्या पंचम भावावर दृष्टी टाकतील, जिथे केतू विराजमान आहे. हे तुमच्या संतान साठी उत्तम राहील. त्यात संस्कारात वृद्धी होईल आणि ते आपल्या जीवनात उन्नती करतील.
उपायः तुम्ही गुरुवार पासून सुरु करून गुरु बृहस्पतीचा बीज मंत्र ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवे नम: चा नियमित जप केला पाहिजे.
मिथुन राशि
बृहस्पती महाराज तुमच्या मिथुन राशी साठी सप्तम आणि दशम भावाचा स्वामी असून एक महत्वपूर्ण ग्रह आहे आणि यामध्ये या गोचर काळात ते तुमच्या द्वादश भावात प्रवेश करणार आहे. देव गुरु बृहस्पती च्या या गोचर प्रभावाने मुख्य रूपात तुमचे द्वादश भावात प्रभावित होईल, याच्या परिणामस्वरूप तुमच्या खर्चात वृद्धी होण्याची शक्यता राहील. तुम्ही धार्मिक आणि उत्तम कार्यांवर खर्च कराल. त्यामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल आणि तुम्ही संतृष्टीने जीवन व्यतीत कराल कारण, तुमचा खर्च विनाकारण गोष्टींवर होणार नाही परंतु, यामुळे तुमच्यावर आर्थिक बोझा नक्कीच वाढू शकतो कारण, खर्च वाढू शकतात. बृहस्पती वृद्धीचा कारक ग्रह असण्याने खर्चात वाढ होऊ शकते. येथे स्थित बृहस्पती महाराज आपल्या पंचम दृष्टीने तुमच्या चतुर्थ भावाला सप्तम दृष्टीने तुमच्या सहाव्या भावाला आणि नवम दृष्टीने तुमच्या अष्टम भावाला पाहतील. बृहस्पतीची दृष्टी चतुर्थ भावात असण्याने तुम्ही आपल्या सुख प्राप्तीसाठी खर्च कराल आणि त्या खर्चांना केल्यानंतर तुम्हाला संतृष्टी आणि सुख प्राप्ती होईल. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि बृहस्पती महाराजांच्या कृपेने त्यांच्या मध्ये धार्मिक प्रवृत्ती वाढेल आणि घरात शुभ कार्य ही होतील ज्यामुळे घरातील वातावरण भक्ती आणि धार्मिक राहील.
उपायः बृहस्पती महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना किंवा ब्राम्हणांना पठाणांच्या वस्तू भेट केल्या पाहिजे.
कर्क राशि
देव गुरु बृहस्पती चे हे वृषभ राशीमध्ये होणारे गोचर तुमच्या कर्क राशीपासून एकादश भावात होत आहे. देव गुरु बृहस्पती तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ग्रह आहे. हे तुमच्या षष्ठ भावाचा स्वामी असण्याच्या सोबतच तुमच्या भाग्य स्थानी म्हणजे नवम भावाचा स्वामी ही आहे आणि नवम भावाच्या स्वामीचे एकादश भावात जाणे तुमच्या भाग्यात वृद्धी करणारे सिद्ध होईल. देव गुरु बृहस्पती च्या या गोचरच्या परिणामस्वरूप तुमच्या महत्वाकांक्षा मध्ये येणाऱ्या बाधा दूर होतील. तुमची व्यावसायिक योजना यशस्वी होईल. जर उच्च शिक्षण ग्रहण करण्याची इच्छा ठेवतात तर, त्यात ही येणाऱ्या बाधा कमी होतील आणि तुम्हाला उत्तम शिक्षण ग्रहण करण्याची संधी मिळेल. देव गुरु बृहस्पती तुमच्या जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात सुपरिणाम प्रदान करतील. तुमच्या कमाई मध्ये ही उत्तम वाढ पहायला मिळेल.
उपायः तुम्ही उत्तम गुणवत्तेचा पुखराज रत्न सोन्याच्या मुद्रिका मध्ये जडवून शुक्ल पक्षाच्या गुरुवारी आपल्या तर्जनी बोटात धारण केले पाहिजे.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
सिंह राशि
देव गुरु बृहस्पती सिंह राशीतील जातकांसाठी पंचम भाव आणि अष्टम भावाचा स्वामी आहे. त्रिकोण भावाचा स्वामी असण्याने हे तुमच्यासाठी एक शुभ ग्रह आहे आणि तुमचा राशी स्वामी सूर्य देवाचे घनिष्ठ मित्र ही आहे म्हणून, देव गुरु बृहस्पती चे हे गोचर तुमच्यासाठी विशेष परिणाम देणारे सिद्ध होऊ शकते. बृहस्पती महाराजांचे हे गोचर तुमच्या राशीपासून दशम स्थानावर असेल. या गोचर च्या प्रभावाने तुम्ही आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या कार्य क्षेत्रात अनुकूल परिणाम प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कराल. अष्टम भावाच्या स्वामीचे दशम भावात जाणे कार्य क्षेत्रात समस्यांचे संकेत देते. या वेळी तुम्ही नोकरी मध्ये बदल अरण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. जर आधीपासूनच तुम्ही आवेदन केलेले आहे तर, या गोचर काळात तुम्हाला दुसरी नोकरी मिळण्याची प्रबळ शक्यता राहील. हे गोचर तुम्हाला हे समजावते की, तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात कुठल्या ही प्रकारच्या अहंकार किंवा दुसऱ्यांना नीच समजण्याच्या प्रवृत्ती पासून बचाव करावा लागेल अथवा, समस्या येऊ शकतात. तुमचा अनुभव खूप चांगला आहे आणि लोक तुमची प्रसंशा ही करतील परंतु, तुम्हाला या गोष्टीला घेऊन अहंकाराची भावनेने ग्रसित होण्यापासून बचाव केला पाहिजे. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सन्मान द्या आणि कार्य क्षेत्रात एक उत्तम वातावरण तयार करा ज्यामुळे तुम्हाला नोकरी मध्ये ही सहज असेल.
उपायः तुम्ही गुरुवार पासून सुरु करून देव बृहस्पती च्या मंत्राचा ॐ बृं बृहस्पतये नमः जप केला पाहिजे.
कन्या राशि
देव गुरु बृहस्पती चे गोचर कन्या राशीपासून नवम भावात होत आहे. तुमच्या राशीसाठी हे तुमच्या चतुर्थ भावात म्हणजे सुख भाव आणि सप्तम भावात म्हणजे व्यवसाय आणि भागीदारी भावाचा स्वामी असून नवम भावात गोचर करत आहे. हे गोचर बऱ्याच बाबतीत तुमच्यासाठी खूप अनुकूल राहील आणि काही बाबतीत तुम्हाला काही आव्हानांचा ही सामना करावा लागू शकतो. देव गुरु बृहस्पतीचे नवम भावात जाणे धर्म कर्माच्या बाबतीत बरीच वाढ करेल. तुम्ही कुटुंबासोबत तीर्थस्थळी जाणे पसंत कराल. मंदिरात आणि तीर्थ स्थानांचे दर्शन करणे तुम्हाला संतृष्टी आणि सुख देईल. या वेळी मोठी संपत्ती खरेदी करण्याचे ही योग बनू शकतात. फक्त इतकेच नांगी तर, जर तुम्हाला चांगली गाडी खरेदी करायची इच्छा असेल तर ती ही या वेळी खरेदी करू शकतात. तुमचे विदेश यात्रेचे योग बनतील. जर तुम्ही आधीपासून व्हिसा ची तयारी केलेली आहे तर, तुमचा व्हिसा लागू शकतो. उच्च शिक्षणासाठी हे गोचर अनुकूल राहील. तुम्हाला आपल्या प्रयत्नात यश मिळेल. जीवनसाथी सोबत सामंजस्य उत्तम राहील. दोन्ही सोबत मिळून यात्रा ही कराल. दूरच्या प्रवासामुळे ही तुमच्यात परस्पर प्रेम वाढेल.
उपायः तुम्ही गुरुवार च्या दिवसापासून सुरु करून श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र चे नियमित पाठ केले पाहिजे.
तुळ राशि
देव गुरु बृहस्पती तुमच्या तुळ राशीपासून अष्टम भावात वृषभ राशीमध्ये गोचर करत आहे. तुंकय्या राशीसाठी हे तृतीय भाव आणि षष्ठ भावाचा स्वामी होऊन अकारक ग्रह आहे आणि शुक्राच्या राशीमध्ये अधिक अनुकूल मानले जात नाही. वरतून याचे गोचर तुमच्या अशुभ भावात होण्याच्या कारणाने हे गोचर तुमच्यासाठी सावधानीने भरलेले असण्याची शक्यता राहील म्हणून, तुम्हाला आपल्या गोष्टींवर नियंत्रण ठेऊन जीवनात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अष्टम भावात उपस्थित असून देव गुरु बृहस्पती तुम्हाला भाऊ बहिणीच्या च्या संबंधात निराशा देऊ शकते. कार्य क्षेत्रात तुमच्या सहकर्मींसोबत तुमचा विवाद होऊ शकतो. त्यांच्या सोबतच्या काही गोष्टी तुमच्यासाठी समस्यांचे कारण बनू शकते. तुम्ही जरी प्रयत्न करत असाल परंतु, या वेळी कर्ज वाढण्याची शक्यता राहील. प्रयत्न हाच करा की, कुठल्या ही प्रकारचे नवीन कर्ज घेऊ नका अथवा, तुम्हाला बऱ्याच काळापर्यंत तुम्हाला ते चुकवावे लागू शकते. आर्थिक रूपात हे गोचर कमजोर राहू शकते आणि तुम्हाला आर्थिक दृष्टीने आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. खर्च अधिक राहतील. तुम्हाला एक लाभ नक्कीच होईल की, तुम्ही धार्मिक दृष्ट्या उन्नतीवान बनाल. तुमची रुची ज्योतिष, अज्ञात आणि धर्माच्या बाबतीत वाढेल. तुम्ही पाठ-पठाण कार्यात उत्तम यश प्राप्त करू शकतात. अष्टम भावातून देव गुरु बृहस्पती तुमच्या द्वादश भाव, तुमच्या द्वितीय भाव आणि तुमच्या चतुर्थ भावावर दृष्टी टाकतील. द्वादश भावावर देव गुरु बृहस्पतीची दृष्टीच्या कारणाने तुमची बाहेर जाण्याची शक्यता अधिक वाढू शकते तथापि, यामध्ये बरेच खर्च ही तुम्हाला करावे लागतील परंतु, बाहेर जाण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात. तुमचे खर्च तर वाढतील परंतु, तुम्हाला स्वास्थ्य समस्यांचा ही सामना करावा लागू शकतो. तुम्हाला गळ्याच्या संबंधित समस्या होऊ शकतात अथवा, पोट संबंधित समस्या, लिवर आणि पचनाच्या संबंधित समस्या तुम्हाला चिंतीत करू शकतात. बृहस्पती महाराजांची दृष्टी तुमच्या द्वितीय भावात होण्याने अचानक धन लाभाचे योग बनू शकतेय. वाद-विवाद आणि कोर्ट कचेरीच्या बाबतीत तुम्हाला धन प्राप्ती होण्याचे योग बनू शकतात.
उपायः बृहस्पती वार दिवशी कच्चे बटाटे, चण्याची दाळ, साजूक तूप, कपूर आणि हळद गोशाळेत दान करा.
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
वृश्चिक राशि
वृश्चिक राशीतील जातकांसाठी बृहस्पती चे गोचर सप्तम भावात होत आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ साठी देव गुरु बृहस्पती मित्राच्या भूमिकेत आहे परंतु, शुक्राच्या राशीमध्ये गोचर करत आहे. बृहस्पती तुमच्यासाठी द्वितीय आणि पंचम भावाचा स्वामी आहे तसेच, पंचम भावाचा स्वामी होऊन सप्तम भावात जाऊन केंद्र त्रिकोण चा संबंध बनवतील जे तुमच्यासाठी राजयोगासारखे परिणाम ही प्रदान करू शकतात. देव गुरु बृहस्पती च्या सप्तम भावात जाणून विराजमान होण्याने तुमच्या व्यापारात वृद्धीचे स्पष्ट संकेत मिळतील. जर आधीपासून तुमच्या व्यापारात काही समस्या सुरु आहे तर, त्या ही कमी होईल आणि एक स्थायित्व प्राप्ती होईल. एक स्थिरता भाव राहील जे तुमच्या व्यापाराला गतिशीलता प्रदान करेल. तुम्ही आपली पुंजी ही व्यापारात लावू शकतात ज्यामुळे व्यापाराला नवीन दिशा मिळेल. काही नवीन आणि अनुभवी व्यक्तींना भेटून आणि त्यांना आपल्या सोबत शामिल करून त्यांच्या सोबत काम करून तुम्हाला व्यापारात उन्नतीच्या भावाचे योग बनतील. तुम्हाला संतान सुखाची प्राप्ती होईल. प्रेम संबंधात वृद्धी आणेल. प्रेम विवाहाचे प्रबळ योग बनतील आणि तुम्ही आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या व्यापारात उन्नतीच्या पथावर असाल. जीवनसाथी सोबतच्या संबंधात शुद्धता येईल आणि तुमचे नाते सुंदर व्यतीत होईल. तुमच्या आणि जीवनसाथी मध्ये परस्पर सामंजस्य सुधारेल आणि एकमेकांच्या प्रति समर्पण भाव ही जागेल. येथे स्थित बृहस्पती तुमच्या एकादश भाव, प्रथम भाव आणि तुमच्या तृतीय भावावर दृष्टी ठेवेल.
उपायः तुम्ही उत्तम गुणवत्तेचा पुखराज रत्न धारण केला पाहिजे.
बृहत् कुंडली: जाणून घ्या ग्रहांच्या तुमच्या जीवनावर प्रभाव आणि उपाय!
धनु राशि
गुरु बृहस्पती तुमच्या धनु राशीचा स्वामी ग्रह असण्यासोबतच तुमच्या चतुर्थ भावाचा ही स्वामी आहे. बृहस्पती चे गोचर 2024 तुमच्या राशीपासून षष्ठ भावात होत आहे. येथे स्थित होऊन देव गुरु बृहस्पती तुमच्या खर्चात वाढीचे संकेत देते. तुम्हाला आपल्या स्वास्थ्य समस्यांच्या प्रति सावधानी ठेवावी लागेल कारण, या वेळी तुम्ही आजारी होण्याचे योग बनू शकतात. राशी स्वामीचे षष्ठ भावात जाणे कोर्ट कचेरी च्या बाबतीत व्यस्तता दाखवते. जर तुम्ही एका गोष्टीसाठी बऱ्याच काळापासून लागलेले आहे तर, या काळात तुम्हाला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल आणि त्यावर खर्च ही करावा लागेल. जर तुम्हाला लोन घ्यायची गरज पडत असेल तर, या काळात तुम्हाला लोन मिळू शकते. बृहस्पती तुमच्या नोकरी मध्ये उत्तम स्थिती निर्मित करतील परंतु, विरोधींना घेऊन तुम्ही थोडे चिंतीत होऊ शकतात आणि तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतील की, आपल्या विरोधींपेक्षा दोन पावले पुढे विचार करावा. षष्ठ भावात स्थित असून देव गुरु बृहस्पती तुमच्या पंचम दृष्टीने तुमच्या दशम भावाला सप्ताहम दृष्टीने तुमच्या द्वादश भावाला आणि नवम दृष्टीने तुमच्या द्वितीय भावाला पाहतील.
उपायः तुम्ही गुरुवारी गुरु मंत्र “ॐ गुं गुरुवे नमः” चा नियमित 108 वेळा जप केला पाहिजे.
मकर राशि
मकर राशीसाठी देव गुरु बृहस्पती तृतीय आणि द्वादश भावाचा स्वामी असून कारक ग्रह बनतात. वर्तमान गोचर मध्ये ते तुमच्या पंचम भावात प्रवेश करतील. देव गुरु बृहस्पती च्या या गोचर च्या परिणामस्वरूप तुम्हाला शिक्षणात उत्तम परिणामांची प्राप्ती होईल. तुमच्या मध्ये योग्य विचारांचा जन्म होईल. धर्म-कर्म, अध्यात्म आणि चिंतन तसेच सामाजिक रूपात उत्तम विचारांचा जन्म तुमच्या मध्ये असेल ज्यामुळे तुम्हाला आपण केलेल्या चुकीच्या कार्याने ग्लानी ही होईल आणि तुम्ही त्याचा पश्चाताप कराल. तुमच्या ज्ञानाचा विस्तार होईल. चांगल्या लोकांसोबत तुम्ही बोलाल आणि त्यांच्याकडून तुम्हाला लाभ होईल. तुम्हाला संतान सुख ही मिळेल. तुमची संतान आज्ञाकारी बनेल आणि त्यांचाकरून तुम्हाला सुख प्राप्ती होईल. देव गुरु बृहस्पती च्या या गोचरमुळे जर तुम्ही विवाहित जातक आहे तर, तुम्हाला संतान प्राप्तीची सुखद वार्ता प्राप्त होऊ शकते. संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रेम संबंधात हे गोचर अनुकूल परिणाम देईल आणि तुमच्या नात्यात परिपक्व बनवेल.
उपायः स्नान झाल्यावर नियमित केसर चा तिलक लावावा.
कुंभ राशि
कुंभ राशीच्या जातकांसाठी बृहस्पती द्वितीय आणि एकादश भावाचा स्वामी असून धन भावाचा स्वामी बनते आणि हे तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे कारण, कुंडली मध्ये याची स्थिती तुमच्या आर्थिक स्थिरतेसाठी महत्वपूर्ण आहे. वर्तमान गोचर मध्ये देव गुरु बृहस्पती तुमच्या राशीपासून चतुर्थ भावात गोचर करतील. वृषभ राशीमध्ये गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी मध्यम रूपात फलदायी राहणार आहे. तुम्ही आपल्या धनाचा प्रयोग आपल्या घरातील साज सज्जेसाठी, घरातील आवश्यकतेची पूर्ती मध्ये, आपल्या जबाबदाऱ्यांचा निर्वाहाणात आणि आपल्या माता च्या स्वास्थ्यासाठी करू शकतात. बृहस्पती येथे स्थित होऊन आपल्या पंचम दृष्टीने तुमच्या अष्टम भावाला, सप्तम दृष्टीने दशम भावाला आणि नवम दृष्टीने द्वादश भावाला पाहतील. गुरु गोचर 2024 च्या अनुसार, बृहस्पती च्या अष्टम भावाच्या प्रभावाने तुम्हाला पैतृक संपत्ती प्राप्त होण्याचे योग बनू शकतात. तुम्हाला अचानक धन लाभ होऊ शकतो. यामुळे सुखाचा अनुभव होईल. जुनी संपत्ती जी पूर्वजांची असेल ती तुम्हाला मिळू शकते यामुळे तुम्हाला प्रसन्नता होईल.
उपायः तुम्ही तुमच्या खिश्यात एक पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवला पाहिजे.
मीन राशि
देव गुरु बृहस्पती मीन राशीचा स्वामी आहे म्हणून, तुमच्यासाठी हे खूप महत्वपूर्ण ग्रह आहे. तुमच्या राशीचा स्वामी असण्यासोबतच हे तुमच्या कर्म भाव म्हणजे की, दशम भावाचा स्वामी ही आहे आणि वर्तमान गोचर वेळी हे तुमच्या राशीच्या तृतीय भावात प्रवेश करेल. तिसऱ्या भावात बृहस्पती विराजमान असणे तुमच्या मध्ये आळस वाढवू शकते. तुम्ही काम टाळणारे असू शकतात आणि यामुळे तुमच्या महत्वाच्या संधी तुमच्या हातातून निघून जाऊ शकतात म्हणून, तुम्हाला सतर्क राहावे लागेल आणि कुठल्या ही संधीला हातातून जाऊ देऊ नका. मेहनत केल्याने यश मिळेल. मित्रांचे सहयोग तुमच्या कामात राहुल. व्यापारात ते तुमची मदत करतील. वैवाहिक जीवनातील ही समस्या दूर करण्यात मित्रांचे सहयोग तुम्हाला मिळेल. लहान यात्रा होतील. भाऊ बहिणींचे पूर्ण सहयोग तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही आपल्या छंदाला महत्व द्याल आणि त्यावर अधिक लक्ष तुमचे राहील. शेजारच्यांसोबत तुमचे संबंध सुधारतील आणि नातेवाइकांमध्ये येणे-जाणे वाढेल.
उपायः तुम्ही तुमचा राशी रत्न पिवळा पुखराज बृहस्पतीवार दिवशी तर्जनी बोटात सोन्याच्या मुद्रेत धारण केला पाहिजे.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा :अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024