बुधाचे धनु राशीमध्ये गोचर:(7 जानेवारी, 2024)
अॅस्ट्रोसेज चे हे विशेष आर्टिकल तुम्हाला बुधाचे धनु राशीमध्ये गोचर बाबतीत माहिती वरदान करेल जे की, 07 जानेवारी 2024 च्या संध्याकाळी 08 वाजून 57 मिनिटांनी होत आहे. बुधाचे धनु राशीमध्ये प्रवेशाने राशी चक्राच्या सर्व 12 राशींवर कसा असेल याचा प्रभाव? या बाबतीत जाणून घेण्याच्या आधी आपण बोलूया ज्योतिष मध्ये बुधाचे महत्व. सोबतच जाणून घेऊ याच्या प्रभावापासून बचाव करण्यासाठी उपाय.
बुधाचे गोचरआपल्या जीवनावर प्रभाव जाणून घेण्यासाठीअॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
मागील काही महिन्यात बुध ग्रहाची चाल आणि स्थितीमध्ये तेजीने परिवर्तन पहायला मिळाले आहे. विशेषतः वृश्चिक राशी आणि धनु राशीमध्ये बऱ्याच वेळा गोचर केलेले आहे. सर्वात आधी बुधाने27 नोव्हेंबर 2023 ला धनु राशीमध्ये गोचर केले होते, नंतर बुद्धीचा कारक ग्रह बुध 13 डिसेंबर 2023 लाच याच राशीमध्ये वक्री झाले होते. या नंतर पुनः आपली राशी परिवर्तन करून 28 डिसेंबर 2023 ला वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केले आणि 02 जानेवारी 2024 ला वृश्चिक राशीमध्येच मार्गी झालेले होते. आता 07 जानेवारी ला बुधाचे धनु राशीमध्ये गोचर होत आहे.
ज्योतिष मध्ये बुध आणि धनु राशीचे महत्व
बुध ग्रह एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अंतर्दृष्टी, स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता दर्शवतो. या व्यतिरिक्त, ते वित्त आणि बँकिंगशी संबंधित गोष्टी, भाषण, भाषा आणि क्षेत्रे समजून घेण्याची क्षमता देखील दर्शवते. याशिवाय व्यक्तीच्या शरीरातील मज्जासंस्था, आतडे, हात, तोंड, जीभ, इंद्रिये, समजण्याची क्षमता, शहाणपण आणि अभिव्यक्ती इत्यादींवर ही त्यांचे नियंत्रण असते. बुध कमी अंतराचा प्रवास, वारंवार सहली, शिक्षण, संप्रेषण, लेखन, मुद्रण, स्टेशनरी, सचिव, वार्ताहर, मेलिंग इत्यादींशी संबंधित कामाचे प्रतिनिधित्व करतो. बुधवार हा भगवान बुधला समर्पित आहे आणि धातूंमध्ये त्याचे तरल धातूवर स्वामित्व आहे. त्यांचा आवडता रंग हिरवा आहे आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी पन्ना रत्न घातला जातो.
आता धनु राशी विषयी बोलायचे झाले तर वैदिक ज्योतिष मध्ये राशी चक्राची नववी राशी धनु आहे, जी अग्नी तत्वाची राशी आहे आणि स्वामित्वाने दुहेरी आणि पुरुष तत्वाची राशी आहे. समृद्धी, प्रेरणा, ज्ञान आणि सौभाग्य सोबतच सर्व धनु राशीचे कारक आहे. बुधाचे धनु राशीमध्ये गोचर विशेषज्ञ, मार्गदर्शक आणि टीचर्स इत्यादी साठी अनुकूल सिद्ध होईल आणि या वेळी तुम्ही दुसऱ्यांना प्रभावित करण्यात सक्षम असाल तथापि, धनु राशीमध्ये बसलेले बुध जातकांना कसे परिणाम देतील, ही गोष्ट पूर्णतः कुठल्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुधाची दशा आणि स्थितीवर निर्भर असेल.
To Read in English Click Here: Mercury Transit In Sagittarius (07 Jan 2024)
हे राशिभविष्य तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. तुमची वैयक्तिक चंद्र राशी जाणून घेण्यासाठी चंद्र राशी कॅल्क्युलेटर वापरा.
बुधाचे धनु राशीमध्ये गोचर: राशी अनुसार राशि भविष्य आणि उपाय
मेष राशि
मेष राशीतील जातकांसाठी बुध तुमच्या तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि बुधाचे धनु राशीमध्ये गोचर तुमच्या नवव्या भावात होत आहे. कुंडली मध्ये नववा भाव धर्म, पिता, दूरची यात्रा, तीर्थ स्थळ, भाग्य आणि उच्च शिक्षणाचा भाव मानले गेले आहे. बुध बुद्धी आणि शिक्षणाचा कारक आहे आणि याच्या परिणामस्वरूप तुमच्या मध्ये धर्म आणि दर्शन संबंधित नवीन गोष्टी समजण्यात रुची वाढेल. या कारणाने तुमच्या ज्ञानात वृद्धी होईल आणि तुम्ही गोष्टींना चांगल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न करू शकाल. बुधाच्या नवव्या भावात गोचर फलस्वरूप मेष राशीतील जातक अध्यात्मिक विषयांच्या बाबतीत अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक होतात सोबतच, हे लोक पुस्तके वाचणे, अध्यात्मिकतेने जोडलेल्या विषयांच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात आणि लोकांना विभिन्न दृष्टीने समजण्याचा प्रयत्न ही करतात. नववा भाव गुरु, मेंटॉर आणि लांब दूरची यात्राचा ही भाव आहे. या कारणाने अध्यात्मिक गुरु आणि मेंटॉर चे तुम्हाला मार्गदर्शन करतांना दिसेल.
या काळात तुम्ही लांब दूरची यात्रा करणे पसंत कराल आणि या यात्रेमुळे तुम्हाला विभिन्न संस्कृतींना जाणून घेणे आणि भिन्न भिन्न जातीच्या लोकांसोबत बोलण्याची संधी मिळेल, यामुळे तुमचा दृष्टिकोन व्यापार असेल. बुध तिसऱ्या भावाचा स्वामी आहे आणि या कारणाने तुमच्या संचार कौशल्यात सुधार पहायला मिळेल आणि तुम्ही आपल्या विचारांना प्रभावी पद्धतीने लोकांसमोर व्यक्त करण्यात सक्षम असाल. सोबतच, आपल्या ज्ञानाला लोकांसोबत शेअर कराल एकूणच, मेष राशीतील जातकांसाठी हे गोचर अध्यात्माने जोडलेले रहस्य आणि भिन्न भिन्न संस्कृतींना जाणून घेण्याच्या आवड वाढवेल.
उपाय: नियमित तुळशीला पाणी घाला आणि नियमित एका पानाचे सेवन करा.
वृषभ राशि
वृषभ राशीतील जातकांसाठी बुध दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे. बुधाचे धनु राशीमध्ये गोचर 07 जानेवारी 2024 ला तुमच्या आठव्या भावात म्हणजे अचानक होणाऱ्या घटना, रहस्य, गूढ विज्ञान इत्यादींच्या भावात होत आहे. जसे बुध तुमच्या आठव्या भावात गोचर करेल तसेच तुमच्या मधील गुप्त आणि रहस्य विज्ञानाने जोडलेल्या क्षेत्राच्या बाबतीत जाणून घेण्याची उत्सुकता वाढू शकते कारण, अथवा भाव लपलेले ज्ञान, परिवर्तन आणि जीवन व मृत्यू च्या रहस्यांनी जोडलेला आहे. बुधाच्या प्रभावाने व्यक्तीमध्ये लपलेल्या रहस्यांना जाणून घेण्याच्या प्रति रुची निर्माण होते.
या काळात तुम्ही दैनंदिन जीवनापासून दूर जाऊ शकता आणि जीवनातील रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता आणि तुमचे ज्ञान वाढवू शकता. आठव्या भावातील बुध दुसऱ्या भावाकडे पाहत आहे, जो कौटुंबिक आणि वैयक्तिक संपत्तीचे प्रतिनिधित्व करतो. परिणामी, तुम्ही पैसे, जोडीदार किंवा संबंधित गोष्टींमध्ये अडकू शकतात. या कालावधीत अपारंपरिक पद्धतींद्वारे किंवा गुपचूपपणे तुमची आर्थिक वाढ कशी करायची याची माहिती तुम्हाला मिळू शकते. सासरच्या लोकांशी तुमचे संबंध वाढण्याची शक्यता आहे परंतु, नकारात्मक बाजू अशी आहे की, हे गोचर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या जसे की, ऍलर्जी, त्वचेशी संबंधित ऍलर्जी, यूटीआय, प्रायव्हेट पार्ट्समध्ये संसर्ग इत्यादी देऊ शकते म्हणून थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.
उपाय: ट्रांसजेंडर्स चा सम्मान करा आणि जर शक्य असेल तर हिरव्या बांगड्या आणि वस्त्र त्यांना द्या.
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
मिथुन राशि
बुध मिथुन राशीतील जातकांसाठी लग्न आणि चौथ्या भावाचा स्वामी आहे. बुधाचे धनु राशीमध्ये गोचर 07 जानेवारी 2024 ला तुमच्या सातव्या भावात होत आहे, जे की, जीवनसाथी आणि व्यवसाय भागीदार चा भाव आहे. याच्या परिणामस्वरूप, बुधाचे गोचर तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी फलदायी सिद्ध होईल. लग्न भावाचा स्वामी सातव्या भावात प्रवेश करेल आणि अश्यात, हे अविवाहित जातकांसाठी बऱ्याच संधी घेऊन येईल जे की, विवाहाच्या बंधनात येण्याची इच्छा ठेवतात परंतु, त्यांना योग्य जीवनसाथी निवडण्यात समस्या होत होती. ते या काळात आपल्या माताच्या मदतीने एक योग्य साथी सोबत विवाह करू शकतात तसेच, जे जातक आधीपासून विवाहित आहेत ते आपल्या जीवनसाथी सोबत या वेळी आठवणींचे क्षण घालवण्यात यशस्वी होतील.
आपल्या व्यावसायिक जीवनाची गोष्ट केली असता या गोचर वेळी तुमचा कल व्यवसाय करणे आणि काही नवीन डील करण्यात होऊ शकतो. तुमचे उत्तम संचार कौशल्य व बोलण्याची पद्धत तुमच्या व्यापारात महत्वाची भूमिका निभावू शकते आणि या कारणाने तुम्हाला अश्या संधी मिळतील ज्या तुमच्यासाठी सहायक सिद्ध होतील. लग्न भावाचा स्वामी बुध दर्शवतो की, या काळात तुम्ही दुसऱ्यांच्या माध्यमाने तुमच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न करतील म्हणजे लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात हे माहिती करण्याचा प्रयत्न करतील. प्रत्नम भाव म्हणजे लग्न भावाला मुख्य रूपात स्वयं भाव ही म्हटले जाते आणि हे दर्शवते की, तुम्ही आपल्या विचारांची देवाण-घेवाण कराल. या व्यतिरिक्त, धर्म आणि दर्शनाच्या बाबतीत बोलतांना दिसतील एकूणच, आपण हे म्हणू शकतो की, सातव्या भावात बुधाचे हे गोचर मिथुन राशीतील जातकांसाठी निजी संबंध आणि व्यावसायिक गोष्टी दोघांमध्ये भागीदारी साठी फलदायी सिद्ध होईल.
उपाय: बेडरूम मध्ये इनडोअर प्लांट ठेवा.
कर्क राशि
कर्क राशीतील जातकांसाठी बुध देव तुमच्या बाराव्या आणि तिसऱ्या भावाचा स्वामी आहे आणि बुधाचे धनु राशीमध्ये गोचर 07 जानेवारी 2024 ला तुमच्या सहाव्या भावात होत आहे जे की, शत्रू, स्वास्थ्य, स्पर्धा, मामा इत्यादीचा भाव आहे. कर्क राशीतील जातकांसाठी जसे ही बुध तुमच्या सहाव्या भावात गोचर करेल याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला असा अनुभव होऊ शकतो की, तुम्ही आपल्या संचारात अधिक विश्लेषणात्मक आणि आलोचना करणारे बनलेले आहे. या काळात कामात येणाऱ्या बाधा आणि व्यत्ययाचा तुम्ही चतुराईने आणि उत्तम रणनीतीने सामना करतांना दिसाल. या काळ वकील आणि कायद्याच्या पेशा ने जोडलेल्या जातकांसाठी उत्तम सिद्ध होईल.
कर्क राशीतील जातक आपल्या उत्तम संचार कौशल्याने आपल्या विरोधी आणि शत्रूंवर मात देतील आणि जर तुम्ही कुठल्या कायद्याच्या बाबतीत फासलेले आहे तर, या गोष्टीतून बाहेर निघण्यात सक्षम होतील. पुढे जाऊया आणि बाराव्या भावावर बुधाच्या दृष्टी विषयी बोलूया, तर हे दर्शवते की, तुम्ही या वेळी विदेशी लोक आणि एमएनसी कंपनींसोबत आपल्या संचाराला वाढवाल. कर्क राशीतील जातक या काळात विभिन्न संस्कृतींच्या लोकांनी जोडण्याचा प्रयत्न करतील सोबतच, या वेळी तुम्हाला विदेशी माध्यमांनी ही व्यापारात लाभ होईल आणि नवीन संपर्कांनी व्यापारात वृद्धी होईल. या काळात तुम्हाला विदेशी माध्यमाने व्यापारात ही लाभ होईल आणि नवीन संपर्कांनी व्यापारात वृद्धी होईल. या काळात तुम्हाला आध्यात्मिक प्रवृत्ती जाणवेल आणि त्यामुळे तुमची आवड या दिशेने वाढताना दिसेल. आरोग्याबद्दल बोलायचे झले तर, या गोचर दरम्यान तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत काळजीत असाल कारण, या काळात त्यांना आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे तुमचे खर्च वाढू शकतात.
उपाय: नियमित गाईला हिरवा चारा खाऊ घाला.
सिंह राशि
सिंह राशीतील जातकांच्या कुंडली मध्ये बुध महाराज धन संबंधित जोडलेल्या गोष्टींना नियंत्रण करते कारण, हे तुमच्या दुसऱ्या भाव आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे. आता बुधाचे धनु राशीमध्ये गोचर 7 डिसेंबर 2024 ला तुमच्या पाचव्या भावात होत आहे. कुंडली मध्ये पाचवा भाव शिक्षण, प्रेम संबंध, संतान, सट्टेबाजी इत्यादींचे प्रतिनिधित्व करते. सोबतच, हे पूर्व पुण्य भाव ही आहे. जसे की, वरती सांगितले गेले आहे की, बुध तुमच्या वित्त ला नियंत्रण करते आणि आता हे पाचव्या भावात गोचर करत आहे जे दर्शवते की, या काळात तुम्ही पाचव्या भावाच्या संबंधित गोष्टी जसे मुलांचे शिक्षण किंवा संतान च्या गरजा आणि विकासावर आधारित खर्च करू शकतात. या व्यतिरिक्त, शंका आहे की, तुम्ही प्रेमी/ प्रेमिका ला इम्प्रेस करण्यासाठी ही धन खर्च कराल. जर कुंडली मध्ये तुमची दशा प्रतिकूल आहे तर, तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही सट्टेबाजी आणि शेअर मार्केट मध्ये हात जमवणे टाळा कारण या काळात तुम्हाला हानी होण्याची शक्यता आहे.
हे गोचर त्या विद्यार्थ्यांसाठी ही अनुकूल सिद्ध होईल जे जनसंचार, गणित, कॉमर्स च्या क्षेत्राने जोडलेले आहे किंवा काही इतर भाषा शिकू शकतात. अकराव्या भावात बुधाची दृष्टी च्या परिणामस्वरीप, तुम्ही आपल्या व्यक्तिगत विकासावर लक्ष द्याल. या काळात तुम्ही अधिकात अधिक ज्ञान अर्जित कराल आणि मोठ्या दृष्टीने आपल्या ज्ञानाला दुसऱ्यांसोबत शेअर करतांना दिसू शकतात. याच्या व्यतिरिक्त, हे जातक आपल्या ज्ञानाचा उपयोग करून समाज कल्याणात योगदान देऊ शकतात. तुमच्यासाठी नेटवर्किंग आणि संचार असे साधन आहे जे तुमची उदेष्य पूर्ती करतील. तुम्ही समान विचारधारा करणाऱ्या व्यक्तीने जोडलेले आणि मिळून लोकांवर आपल्या ज्ञानाचे सकारात्मक प्रभाव टाकाल. शेवटी आपण असे म्हणू शकतो की, सिंह राशीतील जातकांसाठी उच्च आई अध्यात्मिक शिक्षणासाठी ही वेळ अनुकूल सिद्ध होईल.
उपाय: शुक्रवारी देवी सरस्वतीची पूजा करा आणि त्यांना लाल रंगाचे 5 फुल अर्पण करा.
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
कन्या राशि
कन्या राशीतील जातकाची जातकांसाठी बुध तुमच्या दहाव्या आणि लग्न भावाचा स्वामी आहे. बुधाचे धनु राशीमध्ये गोचर 7 डिसेंबर 2024 ला तुमच्या चौथ्या भावात होत आहे. कुंडली मध्ये चौथा भाव माता, घरगुती जीवन, घर, वाहन, संपत्ती इत्यादींचा भाव आहे. बुध तुमच्या चौथ्या भावात असणे दर्शवते की, या काळात तुम्ही घर-कुटुंब आणि आपल्या माता सोबत उत्तम वेळ घालवाल आणि आपल्या घरातील वातावरण आनंदी बनवण्याचा प्रयत्न कराल. या काळात तुम्ही कुटुंबात उत्तम सामंजस्य असलेले पहाल. तुम्ही आपल्या कडून आपल्या कुटुंबातील लोकांना उत्तम जीवन आणि अव्यवस्था दूर करण्याचा प्रयत्न कराल. यामुळे तुम्ही घरात वापरणारी उपकरणे, घराला रिनोव्हेट करणे, नवीन घर किंवा नवीन वाहन इत्यादी खरेदी करण्याची योजना बनवू शकतात.
करिअर च्या दहाव्या भावात बुधाची दृष्टी घर आणि पेशावर जीवनात उत्तम संतुलन कायम ठेवेल. करिअर च्या क्षेत्रात आपल्या ज्ञानाला वाढवणे आणि दुसऱ्यांसोबत शेअर करण्याची भावना विकसित होईल. हा काळ तुम्हाला विचार करून पुढे जाण्याची आहे आणि जबाबदारींना निभावण्याचा सल्ला दिला जातो. या काळात तुमचे ध्येय आपल्या कामाच्या बाबतीत आपल्या करिअर मध्ये यश आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी करावा लागेल. तुम्ही कार्य क्षेत्रात रणनीती बनवून पुढे जाल आणि आपल्या धैयान्ना प्राप्त करण्यात सक्षम असाल. एकूणच, कन्या राशीतील जातकांसाठी हे गोचर दर्शवते आहे की, तुम्ही या काळात आपल्या घर-कुटुंब सोबत उत्तम वेळ घालवाल.
उपाय: शक्य असेल तर, बुधवारी 5-6 कॅरेट चा पन्ना रत्न पंचधातु किंवा सोन्याच्या अंगठीत जडवून घाला कारण, असे केल्याने तुम्हाला शुभ परिणामांची प्राप्ती होईल.
तुळ राशि
तुळ राशीतील जातकांसाठी बुध तुमच्या बाराव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे. बुधाचे धनु गोचर 07 जानेवारी 2024 ला तुमच्या तिसऱ्या भावात असेल. कुंडली मध्ये तिसरा भाव भाऊ-बहीण, आवड, लहान यात्रा, संचार कौशल्य इत्यादींचे प्रतिनिधित्व करते अश्यात, वाणीचा कारक ग्रह असण्याने बुध ग्रहाचे तिसऱ्या भावात गोचर तुळ राशीतील जातकांच्या वाणी आणि संचार क्षमतांना प्रभावशाली बनवेल. या गोचर काळात तुम्ही विशेषतः बोलके असाल आणि या कारणाने माहिती गोळा करणे आणि दुसऱ्यांना शेअर करण्याची इच्छा तुमच्या मध्ये जागृत होईल. या काळात तुमच्या ऊर्जेच्या कारणाने तुमचे विचार रचनात्मक होतील. याच्या परिणामस्वरूप, जीवनातील नवीन क्षेत्राचा शोध करण्यात तुमची रुची वाढेल. तिसरा भाव लहान दूरच्या यात्रेने ही जोडलेला आहे आणि हे दर्शवते की, या काळात तुम्ही आपल्या ज्ञानाला दुसऱ्यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने यात्रा करू शकतात.
दळणवळण, समुपदेशन, अध्यापन आणि प्रवासाशी संबंधित जातकांसाठी हे गोचर उत्कृष्ट ठरेल. तुम्हाला कदाचित या उपक्रमांकडे कल वाटेल. तुमच्या उत्कृष्ट संवाद कौशल्यामुळे तुमचे भावंड किंवा चुलत भावांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्ही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलाल. ते तुमच्या कामाचे कौतुक करताना दिसतील. तिसर्या भावातून, नवव्या भावात बुध ग्रह आहे आणि परिणामी, तुम्हाला तुमच्या वडिलांचा आणि गुरूचा ही पाठिंबा मिळेल.
उपाय: बुधवारी घरात तुळस लावा.
वृश्चिक राशि
वृश्चिक राशीतील जातकांच्या कुंडली मध्ये बुध तुमच्या अकराव्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे. बुधाचे धनु राशीमध्ये गोचर 7 जानेवारी 2024 ला तुमच्या दुसऱ्या भावात होत आहे. जे की, कुटुंब, बचत आणि वाणी इत्यादींचा भाव म्हटले गेले आहे. वृश्चिक राशीतील लोकांसाठी बुध तुमच्या दुसऱ्या भावात उपस्थित असेल आणि या काळात तुमचे लक्ष धन, संसाधन आणि कौटुंबिक वित्ताकडे केंद्रित होईल. तुम्ही दुसऱ्यांसोबत उत्तम चर्चा करण्यात सक्षम असाल. या कारणाने कुटुंबातील लोकांसोबत तुमचे नाते मजबूत होईल आणि तुम्ही त्यांच्या सोबत अध्यात्माने जोडलेल्या गोष्टी करतांना दिसाल. हे गोचर हे ही दर्शवते की, वृश्चिक राशीतील जातक गूढ विज्ञान संबंधित ज्ञान आणि सेवांच्या माध्यमाने आपल्या धन मध्ये वृद्धी करण्याचा रस्ता शोधू शकतात आणि या कारणाने जे जातक ज्योतिषी, अंक शास्त्र, टेरो रीडर्स जश्या क्षेत्रांनी जोडलेले आहे त्यांना या काळात लाभ होईल.
बुधाचे धनु गोचर ही नोकरदार जातकांसाठी चांगले परिणाम आणणारे आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते किंवा तुमचा पगार वाढू शकतो किंवा तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसा मिळू शकतो. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना देखील अनुकूल परिणाम मिळतील. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुम्ही सुखसोयींचे जीवन जगाल आणि त्याच वेळी उत्पन्नाचा प्रवाह ही असेल. बुध दुसर्या भावात आहे आणि तुमच्या आठव्या भावात आहे, परिणामी तुमच्या बचतीत अचानक वाढ होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त संपत्तीत गुंतवणूक करू शकता.
दुसऱ्या भावात स्थित बुधाची दृष्टी तुमच्या आठव्या भावावर होईल जे की, तुमच्या साठी फलदायी सिद्ध होईल. याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षातील लोकांचे समर्थन मिळेल. एकूणच मिळून वृश्चिक राशीतील जातकांसाठी हे गोचर अधिक अनुकूल राहील आणि तुम्ही आपल्या आर्थिक जीवनात स्थिरता आणण्यात लक्ष केंद्रित करतांना दिसाल. सोबतच, कुटुंबातील लोकांसाठी वेळ काढाल.
उपाय: बुधाच्या बीज मंत्राचा जप करा.
धनु राशि
धनु राशीतील जातकांसाठी बुध ग्रह तुमच्या सातव्या भाव आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे. बुधाचे धनु राशीमध्ये गोचर 7 जानेवारी 2024 ला तुमच्या लग्न भावात गोचर करत आहे. सामान्यतः बुधाची पहिल्या भावात स्थिती जातकांना अत्यंत बुद्धिमत्ता बनवते आणि याच्या परिणामस्वरूप तुमच्या मध्ये तुमच्या ज्ञानाला दुसऱ्यांपर्यंत पोहचवण्याची इच्छा जागृत होऊ शकते. तुम्ही तार्किक स्वभावाचे असतात आणि तुमची रुची उच्च शिक्षण प्राप्त करण्यात असते.
शिक्षक, प्राध्यापक किंवा धर्मोपदेशक इत्यादींशी संबंधित असलेल्या धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. या काळात ते संवादाद्वारे त्यांचे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवू शकतील. हा काळ धनु राशीला त्यांच्या आवडीच्या विषयांवर संशोधन आणि शिक्षित करण्यास प्रोत्साहित करतो. वरती म्हटल्याप्रमाणे, तुमचा स्वभाव सर्व बाजूंनी ज्ञान मिळवण्याचा आहे आणि तुमच्या या स्वभावामुळे तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा जाणवेल, ज्यामुळे तुमची वैयक्तिक वाढ आणि समज वाढण्यास हातभार लागेल.
या प्रवास दरम्यान, तुम्हाला तुमच्या मुळांशी जोडलेले वाटेल आणि तुमच्या जीवनाच्या प्रवासाबद्दल खोलवर विचार करता येईल. हा कालावधी जीवनाची उद्दिष्टे, आकांक्षा आणि आपण ज्या दिशेने वाटचाल करू इच्छिता त्या संपूर्ण दिशेने विचार करण्याची वेळ आहे. शिवाय, हे गोचर तुम्हाला नवीन सुरुवात करण्याची आणि नवीन उपक्रम सुरू करण्याची संधी देईल.
बुध देवाची दृष्टी तुमच्या सातव्या भावावर पडत असेल आणि याच्या परिणामस्वरूप, धनु राशीतील जातकांचे वैवाहिक जीवन बरेच आनंदी राहील. तसेच, तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात भागीदारीत सुधारणा दिसून येईल. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून तसेच तुमच्या व्यवसायातील भागीदाराकडून प्रत्येक पावलावर साथ मिळेल. या काळात तुम्ही त्यांच्याशी पैसा, संसाधने, धर्म आणि तत्त्वज्ञान याविषयी चर्चा करू शकता, यामुळे तुम्हाला समाधान वाटू शकते. एकूणच, धनु राशीच्या जातकांसाठी, हा काळ आत्म-चिंतनाचा, वैयक्तिक वाढीचा आणि उच्च ज्ञानाचा पाठपुरावा करण्याचा काळ आहे.
उपाय: भगवान गणपतीला दूर्वा अर्पण करा.
मकर राशि
मकर राशीतील जातकांच्या कुंडली मध्ये बुध तुमच्या सहाव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे. बुधाचे धनु राशीमध्ये गोचर 7 जानेवारी 2024 ला तुमच्या बाराव्या भावात होत आहे. कुंडली मध्ये बारावा भाव विदेश, दुरावा, डॉक्टर, खर्च, विदेशी कंपनी जश्या एमएनसी इत्यादींना दर्शवते. कारण, बुध तुमच्या बाराव्या भावात गोचर करत आहे आणि बाराव्या भावात हॉस्पिटल ने जोडलेला आहे. अश्यात, या गोचरच्या परिणामस्वरूप, तुम्हाला आपले ध्यान आणि स्वास्थ्य गोष्टींवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल. सोबतच, तुम्हाला अधिकात अधिक आराम करण्याचा ही सल्ला दिला जातो. शक्यता आहे की, तुम्ही या वेळी विदेश यात्रेवर जाऊ शकतात आणि उभा कारणाने तुम्हाला विभिन्न संस्कृती आणि अध्यात्मिक परंपरेने जोडण्याची संधी ही प्राप्त होईल. बुधाचे धनु गोचर तुम्हाला स्वभावाने जिज्ञासू बनवते आणि याच्या परिणामस्वरूप, तुम्ही आपल्या बोलण्याच्या पद्धतीने विदेशी लोकांसोबत संपर्क वाढवाल.
मकर राशीतील व्यक्ती या काळात जीवनातील सत्य बाबतीत जाणून घेण्यात आणि ज्ञानाचा विस्तार करण्यात स्वतःचा कल अध्यात्मिकतेकडे वाढवू शकतात. बुधाची सहाव्या भावात दृष्टी अध्यात्मिकता, उच्च शिक्षण आणि नियमित कार्यापासून बचाव करण्याच्या संबंधांना दर्शवते, याच्या परिणामस्वरूप, तुम्ही आपल्या अध्यात्मिक विचार आणि उच्च शिक्षणाच्या आधारावर दुसऱ्यांना सल्ला देण्यात सक्षम असतील. याच्या व्यतिरिक्त, या काळात तुम्ही दूर देश व विभिन्न जातीच्या लोकांसोबत बोललं आणि आपापल्या ज्ञानाचे देवाण-घेवाण कराल. सोबतच तुमचे नेटवर्क वाढवतील एकूणच, मकर राशीतील जातक बुध गोचर वेळी उच्च शिक्षण प्राप्त करतील आणि विदेश यात्रा करणे तुमच्या ज्ञाननाला वाढवतांना दिसतील.
उपाय: बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला.
कुंभ राशि
कुंभ राशीतील जातकांसाठी बुध महाराज तुमच्या कुंडली मध्ये पाचव्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे. बुधाचे धनु राशीमध्ये गोचर 07 जानेवारी 2024 ला तुमच्या अकराव्या भावात होत आहे जे की, धन लाभ, इच्छा पेशावर जीवन, मोठे भाऊ-बहीण, काका इत्यादींचे प्रतिनिधित्व करते, सामान्यतः अकराव्या भावात बुधाची उपस्थिती पेशावर आणि सामाजिक जीवनाचा स्तर वाढवण्यासाठी उत्तम मानले जाते, याच्या परिणामस्वरूप, बुधाचे धनु राशीमध्ये गोचर चा काळ हे जातक आपल्या आपल्यासाठी एक मजबूत आणि उपयोगी नेटवर्क चा निर्माण करण्यात सक्षम असतील सोबतच, आपले मित्र आणि मोठे भाऊ बहिणींचा वेळ व्यतीत करतील. आर्थिक जीवनाविषयी बोलायचे क्साले तर, अकराव्या भावात बुधाचे गोचर तुमच्यासाठी बरेच लाभदायक सिद्ध होईल. या काळात तुम्हाला वित्तीय लाभ होईल आणि तुमच्या कमाई मध्ये वाढ होईल. तुम्ही आपल्या सहकर्मी आणि साथींच्या तुलनेत आपल्या वित्तीय स्थितीचे आकलन करू शकतात.
हा काळ तुम्हाला या गोष्टीवर विचार करण्यासाठी प्रेरित करते की, तुम्ही आपल्या स्किल आणि आपल्या योगदानाच्या अनुरूप कार्य करत आहे आणि काय तुम्हाला यापासून लाभ होत आहे. अकराव्या भावाचा एक मोठा समूह आणि समाजाला दर्शवते आणि याच्या परिणामस्वरूप या काळात तुमचा कल शिक्षक आणि उपदेशक च्या क्षेत्राने जोडण्याकडे होऊ शकतो. पाचव्या भावावर बुधाची दृष्टी शिक्षण आणि अध्ययनाच्या प्रति कल असण्याचे संकेत देत आहे. याच्या परिणामस्वरूप, कुंभ राशीतील जातक आपल्या ज्ञानाला दुसऱ्यांसोबत शेअर करतांना दिसतील. बुद्धाच्या पाचव्या भावात दृष्टी सामाजिक जीवनात तुमची भेट कुठल्या रचनात्मक व बुद्धिमान व्यक्तीने होऊ शकते. जे तुम्हाला शिकणे आणि शिकवण्यात मदतगार सिद्ध होईल एकूणच, कुंभ राशीतील जातकांसाठी हे गोचर मित्र, सहकर्मी आणि मोठ्या भाऊ-बहिणींवर लक्ष केंद्रित करून सामाजिक दृष्ट्या संचार वाढवण्याच्या वेळेला दर्शवते.
उपाय: लहान मुलांना हिरव्या रंगाचे काही समान भेट करा.
मीन राशि
मीन राशीतील जातकांसाठी बुध ग्रह तुमच्या चौथ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे. बुधाचे धनु राशीमध्ये गोचर 07 जानेवारी 2024 ला तुमच्या पेशा आणि कार्यस्थळी भाव म्हणजे दहाव्या भावात होत आहे तथापि, दहाव्या भावात बुधाचे गोचर चांगले मानले जाते विशेषतः व्यापारासाठी. जसे ही बुध तुमच्या दहाव्या भावात गोचर करतील, तुमचे लक्ष तुमच्या पेशावर जीवनाकडे अधिक असेल.
या काळात तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे व्यस्त असाल. या व्यतिरिक्त, एखादी व्यक्ती सरकारी प्रक्रिया किंवा कायदेशीर प्रणालींवर चर्चा करू शकते आणि अधिकृत बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते. तुमच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही कामाच्या ठिकाणी ज्या प्रकारे संवाद साधता त्यावर तुमचे वरिष्ठ खूश होतील आणि तुमच्या कामाचे कौतुक करताना दिसतील. तुमच्या करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी हा कालावधी तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
दहावे भाव अधिकाराशी संबंधित आहे आणि अशा स्थितीत बुधाचे धनु राशीतील गोचर मीन राशीच्या जातकांसाठी अनुकूल असेल जे राजकारणी, धार्मिक गुरु, शिक्षक, व्याख्याते, प्रेरक वक्ते, अधिकारी किंवा कोणत्या ही सरकारी संस्थेशी संबंधित आहेत कारण यावेळी तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल आणि त्यांना तुमच्या मतांशी सहमत व्हाल. नोकरी करणाऱ्यांना या काळात फायदा होईल आणि सकारात्मक परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे ही सहकार्य मिळेल. तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि तुमच्या दोघांमध्ये सौहार्दपूर्ण नाते निर्माण होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही एकमेकांसोबत चांगले आणि अविस्मरणीय क्षण घालवाल.
चौथ्या भावात बुधाची दृष्टी दर्शवत आहे की, शिक्षण आणि उपदेशाच्या माध्यमाने तुमच्या मध्ये मातृभूमी ची सेवा करण्याची इच्छा जागृत होऊ शकते. एकूणच मीन राशीतील जातकांसाठी हे गोचर सरकारी एजन्सी, कायदा आणि कार्यस्थळी आपल्या संपर्कांना वाढण्याची वेळ आहे.
उपाय: घर आणि कार्यस्थळी बुध यंत्राची स्थापना करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा:अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024