अनुराधा नक्षत्राची भविष्यवाणी

तुमचा देवावर गाढ विश्वास आहे. त्यामुळेच तुम्ही कठीण परिस्थितीतही निराश होत नाही. तुमच्या मार्गात अडथळे येऊ शकतात, पण त्यामुळे तुम्ही डगमगत नाही कारण तुम्ही मेहेनती आहात. तुम्ही खूप लवकर अर्थार्जन करायला सुरुवात कराल. तुमचा स्वभाव तसा चिडचिडा आहे.मानसिक शांतीसाठी तुम्हाला नियमित प्रयत्न करावे लागतील. तुम्ही स्पष्टवक्ते असल्यामुळे तुमच्या मनात जे येते ते तुम्ही बोलता. तुम्ही तुमच्या मनात काहीही ठेवत नाही. त्यामुळे तुमच्या शब्दांमुळे काही जण दुखावले जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही एखाद्याची मदत करता, तेव्हा ती अगदी मनापासून करता. त्याचा तुम्ही डांगोरा पिटत नाही. तुम्ही तुमच्या ध्येयाबाबत अत्यंत गंभीर असल्याने कितीही अडथळे आले तरी तुम्ही यशस्वी होता. जी संधी तुम्हाला मिळते, तिचा तुम्ही पूर्ण उपयोग करता. तुम्ही नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यास अधिक इच्छुक अाहात. लहापणापासूनच तुमच्यात व्यवसायकौशल्ये आहेत. त्यामुळे तुम्ही त्यात यशस्वी होणार हे निश्चित. तुम्ही नोकरी करण्याचे ठरवले तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना तुमच्यासाठी अनुकूल करून घेऊ शकाल. तुम्ही तुमच्या आयुष्यात शिस्तबद्ध आहात आणि तत्त्वांना अत्यंत महत्त्व देता. कामाच्या बाबतीतही तुम्ही कडक शिस्त पाळता. तुम्ही एका निश्चित विचारसरणीचे असल्यामुळे तुम्हाला फार मित्र नाहीत आणि तुमचे मित्रवर्तुळ खूप लहान आहे. तुमच्या खडतर प्रवासातून तुम्ही आयुष्यातील धडे शिकाल. ज्यांना तुमच्यातील गुण माहीत आहेत, ते तुमच्याकडून सल्ला घेतील, कारण तुम्ही खूप अनुभवी आहात. कोणत्याही बिकट परिस्थितीमधून वाट काढण्याचे वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे भरपूर संपत्ती असेल कारण तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करता किंवा बचत म्हणून ठेवून देता. गुंतवणूक करण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुम्ही खूप श्रीमंत असाल.
शिक्षण आणि उत्पन्न
वयाच्या १७ व्या किंवा १८ व्या वर्षापासून तुम्ही अर्थार्जन करायला सुरुवात कराल. संमोहनतज्ज्ञ, तांत्रिक, ज्योतिष, हेर, छायाचित्रण, चित्रपटा, संगीत किंवा कलेशी संबंधित काम, व्यवसाय, व्यवस्थापन, समुपदेशन, मानसशास्त्र, विज्ञान, न्युमरोलॉजी, गणित, प्रशासनाशी संबंधित काम, उद्योजक, पर्यटन विभागाशी निगडीत काम इत्यादी कार्यक्षेत्रे तुमच्यासाठी अनुकूल असतील.
कौटुंबिक आयुष्य
तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला फार पाठींबा मिळणार नाही. त्याचप्रमाणे वडिलांशी भांडण होण्याचीही शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जन्मस्थळापासून बहुधा दूर वास्तव्य कराल. तुमच्यापेक्षा तुमचा पाल्य अधिक यश मिळवेल.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024